महिला अधिकार्‍याच्या ऑडिओ क्लीपमुळे खळबळ

नायक वृत्तसेवा, नगर
आत्महत्या केलेल्या वन अधिकारी दीपाली चव्हाण यांचा संदर्भ देत आपल्याही मनात असाच विचार येत असल्याची एका महिला अधिकार्‍याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या एका तालुक्यातील या वरीष्ठ महिला अधिकारी असल्याचे सांगितलं जात आहे. त्यांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधींवर आरोप करताना काही घटनांची उदाहरणेही दिली आहेत. या क्लीपमुळे खळबळ उडाली असून मधल्या काळात वरीष्ठ अधिकार्‍यांशी त्याची भेट झाल्याचे व मतपरविर्तन झाल्याचे सांगण्यात येते.

वन अधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून त्यांनी ही ऑडिओ क्लीप केली आहे. महिला अधिकारी म्हणून होणारा त्रास, वरिष्ठांकडून केले जाणारे दुर्लक्ष, नोकरीत येताना केलेला निर्धार आणि प्रत्यक्षात झालेली निराशा असे सविस्तर कथन त्यांनी या क्लीपमध्ये केले आहे. मध्येच त्या हमसून हमसून रडतानाही ऐकू येतात. हीच आपली सुसाईट नोट समजावी, असेही त्या म्हणत आहेत. तर कधी धीराने लढण्याची शिकवण असल्याचे सांगत आहेत. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Visits: 139 Today: 1 Total: 1110266

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *