कोपरगावमध्ये नगर-मनमाड महामार्गावर खड्डेच खड्डे

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरातील नगर-मनमाड महामार्गावर अपना बाजार समोर रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सध्या शहरासह परिसरामध्ये रिमझिम पाऊस सुरु आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने अनेक दुचाकीस्वार या खड्ड्यांमुळे पडत असून छोटे-मोठे अपघात घडत आहेत.

शहरातील येवला नाका ते मालेगावपर्यंत रस्त्याचा टोलनाका पिंपळगाव जलाल येथे आहे. मात्र दररोज लाखो रुपयांचा टोल वसूल केला जात असतानाही रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. बुधवारी (ता.18) अपना बाजार समोर अनेक दुचाकीस्वार या खड्ड्यांमुळे पडल्याचे चित्र सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहे. निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यावरच प्रशासनला जाग येईल का? असा सवाल आता स्थानिक नागरिक करत आहे.
Visits: 88 Today: 1 Total: 1106494
