चंदनापुरीच्या सरपंचपदी शंकर रहाणे तर उपसरपंचपदी भाऊराव रहाणे यांची निवड

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेली चंदनापुरी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शंकर रहाणे यांची तर उपसरपंचपदी भाऊराव रहाणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळाने 13 पैकी 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता काबीज केली आहे. मंगळवारी (ता.9) सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी शेतकरी विकास मंडळाकडून सरपंच पदासाठी शंकर रहाणे यांनी अर्ज दाखल केला तर उपसरपंच पदासाठी भाऊराव रहाणे यांनी अर्ज दाखल केला. विरोधी गटाकडून कोणाचाही अर्ज न आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अरुण जोर्वेकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चेतन चव्हाण व ग्रामविकास अधिकारी के.व्ही.दुरगुडे यांनी सरपंचपदी शंकर रहाणे तर उपसरपंचपदी भाऊराव रहाणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी नूतन सदस्य अंकुश रहाणे, राजेंद्र भालेराव, सुरेखा काळे, लक्ष्मी रहाणे, तृप्ती बोर्हाडे, सीमा भालेराव, विद्या रहाणे, सुरेश रहाणे, किरण रहाणे, हौसाबाई कढणे, मंगल वाकचौरे आदिंचा सत्कार करण्यात आला. दूध संघाचे संचालक आर.बी.रहाणे, कारखान्याचे माजी संचालक शांताराम कढणे, जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आनंद कढणे, मूळगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कढणे, विलास कढणे, मूळगंगा दूध डेअरीचे अध्यक्ष अनिल कढणे, माजी उपसरपंच विजय रहाणे, तलाठी गागरे, सहाय्यक फौजदार प्रभाकर तोरकडी व ग्रामस्थ उपस्थित होते.
