रेशनचे धान्य घेऊन जाणारा ट्रक पलटी

नायक वृत्तसेवा, राजूर
तालुक्यातील सावरकुटे येथे मोफत वाटपासाठी रेशनचे धान्य घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना गुरुवारी (ता.19) दुपारी घडली.

आंबित, धामनवन, सावरकुटे या भागातील आदिवासी जनतेचे ऑगस्ट महिन्याचे मोफत वाटप करावयाचे धान्य या ट्रकमधून पोहोच केले जात होते. मात्र सावरकुटे गावाजवळ अरुंद रस्त्यामुळे ट्रक शेतात पलटी झाला. या ट्रकमध्ये गहू, तांदळाच्या सुमारे तीनशे गोण्या होत्या. पुरवठा विभागाला ही माहिती मिळताच पर्यायी व्यवस्था करून हे धान्य पाठविण्यात आले. या दुर्घटनेत एमएच. 14, बीजे. 1414 या मालट्रकचे मोठे नुकसान झाले. मात्र जीवितहानी झाली नाही.
Visits: 89 Today: 3 Total: 1108300
