लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून सलग पाच वर्षे शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहरातील येथील तरुणाविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

भाजी विकताना पीडित महिलेची ओळख शहरातील तरुण किरण बाबासाहेब खांडरे याच्याशी होवून नंतर मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात होवून त्यांनी लग्न करण्याचे ठरविले. दरम्यान, पीडितेचे पतीसोबत वाद असल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याबाबत तरुणाला माहिती होताच घटस्फोट झाल्यानंतर लग्न करण्याचे आश्वासन दिले. दरम्यानच्या काळात पीडित महिला पाचवेळा गर्भवती राहिली; परंतु आरोपी खांडरे याने गर्भपाताच्या गोळ्या देऊन विल्हेवाट लावली असल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. हा संपूर्ण प्रकार पीडितेच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच बिंग फुटले आणि आरोपीने एका महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेने शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन किरण खांडरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले या करत आहेत.

Visits: 146 Today: 1 Total: 2122542

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *