अमृतवाहिनीमध्ये ऑनलाईन व प्रायव्हेट क्लाऊडद्वारे प्रभावी शिक्षण ः आ.डॉ.तांबे

अमृतवाहिनीमध्ये ऑनलाईन व प्रायव्हेट क्लाऊडद्वारे प्रभावी शिक्षण ः आ.डॉ.तांबे
ऑनलाईन शिक्षणप्रणाली चर्चासत्राचे उद्घाटन; सर्वच स्तरांतून उपक्रमाचे कौतुक
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना महामारीमुळे शाळा व महाविद्यालयासहित सर्वच जग थांबले आहे. असे असतानाही शिक्षण प्रक्रियेमध्ये खंड न पडता मार्च महिन्यापासून शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे. अमृतवाहिनीतील सर्वच शिक्षक विद्यार्थांना ऑनलाईन यंत्रणेद्वारे मायक्रोसोफ्ट टीम्सवर नियमित व्याख्यान आणि प्रात्यक्षिक देत आहे. यातून ऑनलाईन व प्रायव्हेट क्लाऊडद्वारे प्रभावी शिक्षण होत असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले आहे.


अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑनलाईन शिक्षणप्रणाली चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ.एम. ए. व्यंकटेश, प्रा.डॉ. एस. के. सोनकर, उपप्राचार्य अशोक मिश्रा, डॉ.मधुकर वाकचोरे, डॉ.रेखा आसने, प्रा.रवींद्र ताजणे, प्रा.विजय वाघे आदी उपस्थित होते.


लॉकडाऊन काळात अमृतवाहिनीमध्ये इन्स्टिट्युटशनल रिपोझटरीत प्रत्येक विद्यार्थ्याला लॉगिन देण्यात आले आहे. विद्यार्थी आपल्या मोबाईल व कॉम्प्युटरद्वारे हस्तलिखित नोट्स, व्हिडीओ लेक्चर, प्रात्यक्षिक, गृहपाठ डाऊनलोड करू शकतात. प्रायव्हेट क्लाऊड तयार केल्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य घरबसल्या उपलब्ध होत आहे. तसेच शैक्षणिक वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांचे व्याख्यान, प्रश्नोत्तरे, शंकानिरसन आणि उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदवली जाते. क्लाऊड कॉम्प्युटिंग या विषयामध्ये पीएचडी. पूर्ण केलेल्या डॉ.सोनकर यांनी संशोधनाचा उपयोग करून त्यांनीही महाविद्यालयासाठी प्रायव्हेट क्लाऊड तयार करून त्यावर इन्स्टिट्युटशनल रिपोझटरी डिप्लोय केली आहे. संशोधन करून त्या संशोधनाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयातील शिक्षक करत आहे.


अमृतवाहिनीच्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीवरील कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त आमदार डॉ.सुधीर तांबे, शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ.एम. ए. व्यंकटेश आणि सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

Visits: 11 Today: 1 Total: 82846

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *