बोरी तलावाचे आमदार लहामटेंच्या हस्ते जलपूजन
बोरी तलावाचे आमदार लहामटेंच्या हस्ते जलपूजन
नायक वृत्तसेवा, कोतूळ
अकोले तालुक्यातील बोरी आणि कोतुळ गावाला पिण्याचा पाणी पुरवठा करणारा बोरी लघू पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहू लागल्याने नुकतेच आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांच्यावतीने सरपंच संजय साबळे यांनी आमदार लहामटे यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना आमदार लहामटे म्हणाले, कोरोना काळात गेल्या सहा महिन्यांपासून मी जनते बरोबर आहे. या काळात माझ्या तीन कोरोना टेस्ट केल्या. जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठिशी असल्याने असल्याने या तिन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या. कोरोनामुळे चालू वर्ष बिकट आहे. प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. यावर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने सर्व धरणे भरली आहेत. तरी धरणांचे पाणी नियोजन आवश्यक आहे. शेतकर्यांनी ठिबककडे वळाले पाहिजे असे सांगत त्यांनी मुळा परिसरातील विकासकामांचा बॅकलॉग भरून काढू असे आश्वासन दिले. याप्रसंगी पोलीस पाटील दारकू कचरे, रामदास बांगर, गणपत कचरे, मदन साबळे, भास्कर साबळे, नामदेव कचरे, शरद साबळे, रोहिदास पवार, भाऊसाहेब साबळे, भानुदास शेंगाळ, सोमनाथ साबळे, चंद्रभान साबळे, दामू शेंगाळ, सोपान शेंगाळ, गोरख शेंगाळ, शिवाजी साबळे, अकोले पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता ए. पी. खुळे, श्री.आभाळे, दादाभाऊ बांगर, सुनील बोर्हाडे, किशोर गंभीरे, कुंडलिक शेंगाळ, राजेंद्र साबळे, बाळासाहेब साबळे, रामकृष्ण शेंगाळ, कुंडलिक कचरे, यमाजी गंभीरे, देवराम गंभीरे आदी उपस्थित होते.