साठ शाळांतील अठराशे विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप अॅप्रोच संस्थेचा उपक्रम; ज्ञानदीप प्रतिष्ठानने साधला समन्वय
नायक वृत्तसेवा, अकोले
ग्रामीण भागात पहिली ते चौथीच्या शाळा अद्यापही बंद आहेत. तरीही शिक्षण सुरू रहावे यासाठी शाळांतून प्रयत्न सुरू आहेत. सध्याच्या काळात ग्रामीण भागातील काही मुलांना अभ्यासासाठी लेखन साहित्य उपलब्ध करुन द्यावे या उद्देशाने पुण्याच्या अॅप्रोच हेल्पिंग हँडस् फाऊंडेशन संस्थेने अकोले तालुक्याच्या आदिवासी भागातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय दप्तर, दहा वह्या, शिसपेन्सिल, खोडरबर, पट्टी, पाटी, छोटे डस्टर, चित्रकला वही, रंग, सुईंग किट, मास्क, सॅनिटायझर वर्षभराच्या स्वयंअध्ययनास स्वाध्याय पुस्तिका अशा प्रकारच्या साहित्याने परिपूर्ण स्कूल किट रुरल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल एज्युकेशन या प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून दिले.
यामध्ये तालुक्यातील तीर्थाचीवाडी, शेरेवाडी, पाडोशी, सावरकुटे, जाधववाडी, पागिरवाडी, नायकवाडी, ठाकरवाडी, सोंगाळवाडी, काठवटवाडी, देवाचीवाडी अशा साठ शाळांतील अठराशे विद्यार्थ्यांना दहा लाख रुपये किंमतीचे स्कूल किटचे वाटप करण्यात आले. आवश्यक सर्व साहित्याने परिपूर्ण भरलेलं नव दप्तर पाहून मुले आनंदून गेली होती. प्रातिनिधीक स्वरूपात तालुक्यातील काही शाळांमध्ये स्कूल किटचे वाटप करण्यात आले. यावेळी अॅप्रोच फाउंडेशनच्या संचालिका पायल मुजुमदार, स्नेहा जाधव, अमोल जाधव, भानुदास आभाळे, गीता रामदासी, विराज संगारे, नंदिनी रामदासी, संदेश मिटकरी, मनीष सोनवणे, भावना रांका, आरती पागे, केतकी जगताप, अनुराग पैठणकर, सुश्रृत पाटणकर, शिशीर जैन, सभ्यता जैन, गणेश वाघस्कर, अयाज शेख आदी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोविडचे नियम पाळून विद्यार्थ्यांना ह्या स्कूल किटचे वाटप करण्यात आले.
याचबरोबर शिक्षकांनी अधिक कृतिशील व्हावं, प्रयोगशील व्हावं म्हणून कार्यरत असलेल्या ज्ञानदीप प्रतिष्ठानने तालुक्यातील गरजू शाळांच्या विद्यार्थ्यांची मागणी संस्थेकडे केली होती. वाडीवस्तीवरील शाळांतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना तर मोठ्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना किट उपलब्ध करून देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या पिसेवाडी शाळेत झालेल्या वाटप कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत उपस्थित होते. तर वाशेरे येथे झालेल्या कार्यक्रमास पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी जालिंदर खताळ, बाळासाहेब दोरगे, राजेश पावसे उपस्थित होते. यावेळी गोकुळ नेहे, सतीश वैद्य, अनिल पवार, गणपत सहाणे, भाऊसाहेब हासे, अरुण फरगडे, बाळासाहेब शेळके, राजेंद्र सदगीर, नितीन नेहे, तानाजी वाडेकर, धनंजय गाडेकर, दत्तात्रय शेळके, सुनील गोडसे, गोरक्ष देशमुख, संजय भोर, संजय मुखेकर, ज्ञानदेव फापाळे, सचिन फुलसुंदर, बाळासाहेब बांबळे, नामदेव सोंगाळ, सोमनाथ घोरपडे, अनिल कुटे, राजू थोरात, जयवंत लांडे, सुनील डेरे, नरेंद्र राठोड, बाळासाहेब डेरे, राजू मोहिते, दीपक बोर्हाडे, शिवाजी भगत, राजकमल नवले, सुनीता रुपवते, शिल्पा भांगरे, अनुराधा नेहे आदिंनी सहकार्य केले.
ग्रामीण भागातील सहा ते दहा वयोगटातील मुलांसाठी आमची संस्था काम करते आहे. शाळा बंद असताना मुलांचं शिक्षण सुरू रहावं यासाठी आम्ही गरजू विद्यार्थ्यांना अराईज प्रकल्पांतर्गत स्कूल किटचे वाटप करत आहोत.
– पायल मुजुमदार, स्नेहा जाधव (संचालिका, अॅप्रोच हेल्पिंग हँडस् फाऊंडेशन पुणे)
शाळा व संस्था स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय साधण्याचं काम ज्ञानदीप करत आहे. तालुक्याला अठराशे स्कूल किट प्राप्त झाले. ते साठ शाळांत वाटप करण्यात आले. किटमध्ये स्वाध्याय पुस्तिकेचाही समावेश असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी किटचा चांगला फायदा होईल.
– भाऊसाहेब कासार