शेतकरी कन्येचे बारावी परीक्षेत नेत्रदीपक यश
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील विठे येथील शेतकरी कन्या श्रृती रामनाथ आवारी हिने प्रतिकूल परिस्थितीत अॅड. मनोहरराव नानासाहेब देशमुख महाविद्यालय राजूरच्या वाणिज्य विभागात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
श्रृती आवारी हिने 77.83 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. कोरोनामुळे शेतकर्यांची अवस्था बिकट झालेली असताना आई-वडिलांना शेतातील कामाला मदत करून श्रृतीने हे नेत्रदीपक यश संपादन केले आहे. कुठल्याही सुख-सुविधा नसताना मोबाईल नेटवर्कच्या अडचणींवर मात करून दिवसभर शेतात काम व रात्रीच्या वेळी बारावीचा अभ्यास पूर्ण केला. या यशाबद्दल माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड. एम. एन. देशमुख, सचिव टी. एन. कानवडे, प्राचार्य दिलीप देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.
Visits: 47 Today: 1 Total: 433714