आरोग्य सर्वेक्षणातून पठारभागात आढळताहेत उच्चांकी रुग्ण! साकूर गटात आजही विक्रमी रुग्णसंख्या; शहरासह तालुक्यातील संक्रमणातही वाढ..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रशासनाकडून घरोघरी जावून नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु करण्यात आल्याने ‘टाळेबंदीत’ असूनही जिल्हा परिषदेच्या साकूर गटातून मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत आहेत. रुग्णवाढीचा हा सिलसिला आजही कायम असून पठारावरील 19 गावांमधून आज तब्बल 80 रुग्ण समोर आले आहेत, त्यात एकट्या साकूरमधील 29 जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पठारभागातील संक्रमणात घरेच्या घरे संक्रमित होत असून अबालवृद्धांना कोविडची लागण झाली आहे. आज तालुक्यातील 158 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात शहरातील 19 जणांसह अन्य तालुक्यातील सहा रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील सक्रीय रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ झाली असून उपचाराधीन रुग्णांची संख्या साडेअकराशेच्या जवळ गेली आहे. आज वाढलेल्या रुग्णसंख्येने तालुका आता 25 हजार 265 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. शासकीय आकडेवारीनुसार आत्तापर्यंत तालुक्यातील 402 जणांचा कोविडने बळी घेतला आहे.


कोविडकडे दुर्लक्ष करुन आपल्या पाल्यांचे धुमधडाक्यात विवाह करण्याच्या कृतीने पठारभागातून जवळपास संपलेले संक्रमण पुन्हा परतले आणि बघताबघता साकूरगटासह जवळपास संपूर्ण पठारभागात त्याचा प्रादुर्भाव वाढला. पठारभागातील साकूर आणि घारगाव ही दोन गावे आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न असून तेथील बाजारपेठांमध्ये आसपासच्या शंभर गावांची उलाढाल होत असल्याने साकूर व घारगावला पठारची राजधानी समजले जाते. त्यामुळे साहजिकच साकूरमध्ये शेकडोंच्या उपस्थितीत साजर्‍या झालेल्या विवाहांनी संक्रमणाचे ओघळ बाजारपेठेपर्यंत आणि तेथून विविध ठिकाणांवर पोहोचवण्याचे काम केले आणि आटोक्यात आलेली स्थिती पुन्हा बिघडवली. या हलगर्जीपणाचा सर्वाधीक फटकाही साकूरसह पठारभागाला बसला.


यासोबतच पठारभागात अजूनही अनेक खासगी डॉक्टर्स आपल्याकडे दाखल झालेल्या रुग्णावर परस्पर उपचार करीत असल्याने व ज्या रुग्णांना लक्षणे अथवा त्रास नाही अशा रुग्णांना औषधोपचारांवर घरी सोडीत असल्याने संक्रमणात वाढ होण्यात हे देखील एक कारण पुढे आले आहे. मागील संक्रमणाच्या वेळी अशा खासगी डॉक्टरांमूळेच अनेक रुग्णांचे जीव धोक्यात आले व त्यातून काहींचे जीवही गेले, मात्र अजूनही या परिस्थितीत बदल झाला नसल्याने सर्वेक्षणानंतरही या परिसरातील संक्रमण संपूर्णतः आटोक्यात येईल का याबाबत साशंकता आहे. आजच्या अहवालातून साकूरसह घारगाव, नांदूर, सावरगाव घुले, पिंपळगाव देपा व खंदरमाळ या परिसरातून अधिक रुग्ण समोर आले आहेत.


आज शासकीय प्रयोगशाळेचे नऊ, खासगी प्रयोगशाळेचे 111 व रॅपीड अँटीजेनच्या निष्कर्षातून समोर आलेल्या 38 अहवालातून तालुक्यातील 158 जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले. त्यात अन्य तालुक्यातील सहा जणांचा समावेश असल्याने प्रत्यक्षात तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत 152 रुग्णांची भर पडली आहे. आजच्या अहवालातून संगमनेर शहरातील रुग्णसंख्येतही वाढ झाली असून 19 जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. त्यात इंदिरानगर मधील 27 वर्षीय महिला, मारवाडी गल्लीतील 14 वर्षीय मुलगा, गोविंद नगरमधील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मालदाड रोडवरील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 58 वर्षीय इसम, 57 वर्षीय व 33 महिला व सात वर्षीय मुलगा, देवी गल्लीतील 75 वर्षीय महिला, उपासणी गल्लीतील 25 वर्षीय तरुणासह 24 वर्षीय महिला, अकोले नाका येथील 52 वर्षीय इसम व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 51 व 44 वर्षीय इसमांसह 44 वर्षीय महिला, 35 व 25 वर्षीय तरुण, 20 वर्षीय तरुणी व 15 वर्षीय मुलाचा समावेश आहे.


तालुक्याच्या पठारभागातील 19 गावांमधून आज 80 रुग्ण समोर आले त्यात साकूर येथील 70 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 58, 48 व 47 वर्षीय इसम, 38 वर्षीय दोघे, 37, 36 वर्षीय दोघे, 28 वर्षीय दोघे, 25 वर्षीय तिघे, 24, 22, 21 व 17 वर्षीय तरुण आणि पाच वर्षीय मुलगा, 50, 37, 36 व 24 वर्षीय दोन महिला, 19 वर्षीय तरुणी, 17, 13 व सात वर्षीय मुली, बिरेवाडीतील 49 व 24 वर्षीय महिला, कुंभारवाडी येथील 35 वर्षीय महिला, हिरेवाडीतील 60 वर्षीय महिला, जांभूळवाडीतील 45 वर्षीय इसमासह 20 वर्षीय तरुणी, पिंपळदरी येथील 34 वर्षीय तरुण, आंबी खालसा येथील 69 व 26 वर्षीय महिला, बोरबन येथील 31 वर्षीय तरुण, 29 वर्षीय महिला व सहा वर्षीय मुलगी, खंदरमाळ येथील 62 व 50 वर्षीय महिला, 31 वर्षीय तरुण, 16, 14 व 12 वर्षीय मुली व दहा वर्षीय मुलगा,


अकलापूर येथील 25 वर्षीय महिलेसह चार वर्षीय मुलगा, वरवंडी येथील 61 वर्षीय महिला, पिंपळगाव माथा येथील 50 वर्षीय इसम, पिंपळगाव देपा येथील 53 व 44 वर्षीय इसमांसह 49 वर्षीय महिला17 वर्षीय मुलगी, 15 व 13 वर्षीय मुले, सावरगाव घुले येथील 80 व 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 42, 27 व 26 वर्षीय महिला, नऊ वर्षीय मुलगी व सहा वर्षीय मुलगा, एठेवाडीतील 67 वर्षीय महिला, बोटा येथील 37 व 32 वर्षीय तरुण, नांदूर येथील 58 व 55 वर्षीय इसमांसह 55 वर्षीय महिला, 35 वर्षीय तरुण व 14 वर्षीय मुलगा आणि घारगाव येथील 85 वर्षीय महिलेसह 78 व 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 55 व 51 वर्षीय इसम, 37 वर्षीय तरुण व 16 वर्षीय मुलगा आदींना कोविडची लागण झाली आहे.


पठारासह तालुक्यातील 27 गावे आणि वाड्यावस्त्यांमधूनही आज 53 रुग्ण समोर आले. त्यात सावरगाव तळ येथील 27 वर्षीय तरुण, झोळे येथील 28 वर्षीय तरुण, पिंपळे येथील 40 वर्षीय महिला, निमोण येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चिकणी येथील 30 वर्षीय तरुण, सुकेवाडीतील 40 वर्षीय तरुण, सादतपूर येथील 45 वर्षीय महिला, मालदाड येथील 19 वर्षीय तरुणी, कनोली येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 23 वर्षीय तरुण, रायते येथील 55 वर्षीय महिला, ओझर खुर्द येथील 56 वर्षीय महिलेसह 52 वर्षीय इसम,निमज येथील 59 वर्षीय इसमासह 45 वर्षीय महिला, मीरपूर येथील 23 वर्षीय तरुण, मंगळापूर येथील 59 वर्षीय इसम, कोकणगाव येथील 42 वर्षीय तरुणासह 28 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी व सहा वर्षीय मुलगा, जवळे कडलग येथील 46 वर्षीय इसम,

गुंजाळवाडीतील 45 वर्षीय महिला, धांदरफळ बु. येथील 60 वर्षीय महिला, चिंचोली गुरव येथील 65 वर्षीय दोघा ज्येष्ठ नागरिकासंह 60, 47 व 28 वर्षीय महिला, 58 वर्षीय इसम व 27 वर्षीय तरुण, आश्‍वी खुर्द येथील 32 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षीय महिला व 44 वर्षीय इसम, चंदनापूरी येथील 42, 39 व 28 वर्षीय तरुणासह 26 वर्षीय महिला, निळवंडे येथील 56 वर्षीय इसमासह 30 वर्षीय तरुण, कासारा दुमाला येथील 40 वर्षीय तरुणासह 28 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 67, 51, 45, 40 व 30 वर्षीय महिला, 53 वर्षीय इसम व 28 वर्षीय तरुण, आश्‍वी बु. येथील 28 वर्षीय तरुणासह 21 वर्षीय महिला व कोल्हेवाडी येथील 35 वर्षीय तरुण. तसेच अन्य तालुक्यातील रुग्णांमध्ये इगतपूरी येथील 40 वर्षीय तरुण, अहमदनगर येथील 32 वर्षीय तरुण, म्हैसगाव येथील 38 वर्षीय महिला, वीरगाव येथील 38 वर्षीय तरुण, दोडी बु. येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व घोगरगाव येथील 87 वर्षीय वयोवृद्ध नागरिकासचा समावेश आहे.

गेल्या 1 ऑगस्टपासून जिल्ह्यात दररोज समोर येणार्‍या रुग्णांची संख्या आठशेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सहाशेच्या घरात आलेली जिल्ह्याची सरासरी रुग्णगती चिंताजनकरितीने वाढली असून मागील चार दिवसांत रुग्ण समोर येण्याची गती 844 रुग्ण प्रतिदिनावर गेली आहे. आजच्या अहवालातून संगमनेरसह पारनेर, श्रीगोंदा, नेवासा, नगर ग्रामीण, कोपरागव व अहमदनगर महापालिका क्षेत्रातील संक्रमण वाढल्याचे समोर आले असून जामखेड, श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील संक्रमणात मात्र काही प्रमाणात घट झाली आहे. गेल्या चार दिवसांतील सलग रुग्णवाढीने जिल्ह्यात सर्वाधीक वेगाने रुग्ण समोर येणार्‍या तालुक्यात संगमनेरचा पहिला क्रमांक असून तालुक्यातून दररोज सरासरी 140 रुग्ण समोर येत आहेत, तर पारनेर तालुक्यातील सरासरी रुग्णगती 97 रुग्ण दररोज आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेचे 150, खासगी प्रयोगशाळेचे 336 व रॅपीड अँटीजेनच्या चाचणीद्वारा समोर आलेले 385 अशा एकूण 871 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात अव्वलस्थानी संगमनेर 158, पारनेर 136, शेवगाव व श्रीगोंदा प्रत्येकी 71, पाथर्डी 60, नेवासा 58, नगर ग्रामीण 47, अकोले 44, कर्जत व राहाता प्रत्येकी 42, अहमदनगर महापालिका क्षेत्र व कोपरगाव प्रत्येकी 34, श्रीरामपूर 30, जामखेड व राहुरी प्रत्येकी 16, इतर जिल्ह्यातील अकरा व इतर राज्यातील एका रुग्णाचा त्यात समावेश आहे. आज वाढलेल्या रुग्णांनी जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 3 लाख 2 हजार 585 झाली आहे.

Visits: 98 Today: 2 Total: 434804

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *