कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या युवा जिल्हाध्यक्षपदी कहाणे

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा येथील अमोल अनिल कहाणे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या अहमदनगर युवा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

अमोल कहाणे यांनी कायमच शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. त्यामुळे त्यांच्या याच कामाची दखल घेवून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी निवड करुन निवडीचे पत्रही प्रदान केले आहे. सदर निवडीनंतर बोलताना कहाणे म्हणाले, गेल्या अनेक महिन्यांपासून सर्व सामान्य शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. त्यातच शेतीमालाला बाजारभाव नाही, एकामागून एक संकटे येत असूनही त्यांना कोणीच वाली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा समस्या सोडविण्यासाठी सतत पुढे राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

Visits: 230 Today: 4 Total: 1105879

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *