कडकडीत ‘टाळेबंदी’ असूनही पठारभागातील रुग्णसंख्येत आजही वाढ! टाळेबंदीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने प्रशासनाची जबाबदारी वाढली : प्रांताधिकारी डॉ.मंगरुळे..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नियमांची पायमल्ली करुन तालुक्याच्या पठारभागात धुमधडाक्यात साजर्‍या झालेल्या विवाह सोहळ्यांमधून संक्रमणाचा वाढलेला स्तर स्वयंस्फूर्तीची टाळेबंदी लागू होवूनही अद्याप खाली आलेला नाही. आजही जिल्ह्यात सर्वाधीक रुग्ण समोर आलेल्या संगमनेर तालुक्यात एकूण रुग्णसंख्येच्या निम्मी रुग्णसंख्या पठारभागात आढळली आहे. आज तालुक्यातील 45 गावांमधून 126 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात शहरातील 18 जणांसह पठारावरील सतरा गावांतील 58 जणांचा समावेश आहे. वाढत्या संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारपासून पठारभागात दहा दिवसांची टाळेबंदी घोषीत झाली असून त्याला साकूर गटातील सर्व गावांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे प्रशासनाची जबाबदारी वाढली असून सर्वेक्षणाच्या माध्यमातून पुढील आठ दिवसांत पठारावरी संक्रमण कमी करण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आल्याची माहिती संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी दिली.


शासन व प्रशासनाकडून वारंवार गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन होवूनही साकूर परिसरातील काही जणांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या पाल्यांचे विवाह सोहळे अगदी हजार-दिड हजारांच्या उपस्थितीत अगदी धुमधडाक्यात साजरे केले. त्याचा परिणाम साकूर गटात कोविड संक्रमणाचा अक्षरशः उद्रेक होण्यात झाला असून साकूरसह आसपासची बहुतेक गावे बाधित झाली आहेत. अचानक वाढलेल्या संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर पठारभागाच्या दौर्‍यावर आलेल्या जिल्हाधिकार्‍यांनी साकूरच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना स्वयंस्फूर्तीने टाळेबंदी पाळण्याचे आवाहन केले होते. त्याला शनिवारपासून (ता.31) सुरुवात झाली असून साकूरसह गटातील 20 गावे कडकडीत बंद ठेवण्यात आली आहेत. असे असतांनाही गेल्या दोन दिवसांत या परिसरातील संक्रमणात कोणताही फरक पडल्याचे दिसून आले नाही. रविवारप्रमाणे आजही तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येतील निम्मे रुग्ण पठारभागातून समोर आले आहेत, त्यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढल्या असून संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.


साकूर गटात लागू झालेल्या ‘टाळेबंदी’ची पाहणी करण्यासाठी आज संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी पठारभागाचा दौरा केला. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत साकूर गटातील 20 गावांनी दहा दिवसांच्या टाळेबंदीला दिलेला मोठा प्रतिसाद पाहून या अधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले. मात्र त्याचवेळी नागरिकांनी आपली भूमिका वठविली असून आता प्रशासनाची पाळी असल्याचे सांगत पुढील आठ दिवसांत घरोघरी जावून लक्षणे असलेले व आजारी असलेले रुग्ण शोधून त्यांना विलगीकरणात ठेवणे, त्यांच्या स्राव चाचण्या करणे यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले.


आज शासकीय प्रयोशाळेच्या 14, खासगी प्रयोगशाळेच्या 93 व रॅपीड अँटीजेनच्या 19 अहवालातून संगमनेर तालुक्यातील 126 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात शहरातील 18 जणांसह पठारभागातील सतरा गावांतील 58 जणांचा समावेश आहे. आज समोर आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील मालदाड रोडवरील 51 वर्षीय इसमासह 36 व 32 वर्षीय तरुण, साईनगर परिसरातील 83 वर्षीय वयोवृद्धासह 36 वर्षीय तरुण, शिवाजीनगर मधील 32 वर्षीय तरुण व संगमनेर असा पत्ता असलेल्या 82 वर्षीय वयोवृद्ध नागरिकासह 50 वर्षीय इसम, 43, 40, 38, 36, 22 व 18 वर्षीय तरुण, 65, 37 व 30 वर्षीय महिला व 22 वर्षीय तरुणीला संक्रमण झाले आहे.


पठारभागातील घारगाव येथील 38 वर्षीय तरुण, शिंदोडी येथील 80 वर्षीय वयोवृद्ध नागरिकासह 55 वर्षीय महिला, वरवंडी येथील 65 वर्षीय महिलेसह 50 वर्षीय इसम, बोटा येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 44 वर्षीय इसम, 28 वर्षीय दोन तरुण व 26 वर्षीय महिला, मांडवे बु. येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 51 वर्षीय महिला, 38 वर्षीय तरुण व 16 वर्षीय मुलगा, कारवाडीतील (पिंपळगाव देपा) 71 वर्षीय महिलेसह 41 वर्षीय तरुण, खंदरमाळ येथील 75, 35 व 32 वर्षीय महिला, 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षीय इसम, 43, 42 व 34 वर्षीय तरुण व 16 वर्षीय मुलगा, अकलापूर येथील 54 वर्षीय महिलेसह चार वर्षीय मुलगा, आंबी खालसा येथील 55 वर्षीय इसमासह 41 व 28 वर्षीय तरुण, शेळकेवाडीतील 55 वर्षीय इसम,


पिंपळगाव माथा येथील 65 व 35 वर्षीय महिलांसह 13 वर्षीय मुलगी, साकूर येथील 50 वर्षीय दोन व 28 वर्षीय महिला, 48 वर्षीय इसम, 23 व 17 वर्षीय तरुण, 14 वर्षीय मुलगा, 22, 20 व 19 वर्षीय तरुणी, 16, 13, 11 व दोन वर्षीय मुली, चिंचेवाडीतील 26 वर्षीय महिला, हिरेवाडी येथील 55 वर्षीय महिलेसह 50 वर्षीय इसम व 20 वर्षीय तरुणी, बिरेवाडीतील 45 वर्षीय इसमासह 22 वर्षीय तरुण, पिंपळगाव देपा येथील 40 वर्षीय तरुणासह 35 वर्षीय महिला व 17 वर्षीय तरुणी व कौठे मलकापूर येथील 29 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तालुक्यातील अन्य 28 गावांमधून 48 जणांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात औरंगपूर येथील 35 वर्षीय महिला, निमगाव जाळीतील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कौठे धांदरफळ येथील 60 व 30 वर्षीय महिलांसह 13 वर्षीय मुलगा व सहा वर्षीय बालिका,


चिंचोली गुरव येथील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 42 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 65 वर्षीय महिलेसह 15 वर्षीय मुलगा, मंगळापूर येथील 36 वर्षीय तरुणासह 30 वर्षीय महिला, पांगरी येथील 40 वर्षीय तरुण, आश्‍वीतील 52 वर्षीय इसम, वाघापूर येथील 35 वर्षीय महिला, वेल्हाळे येथील 36 वर्षीय तरुण, धांदरफळ बु. येथील 84 वर्षीय वयोवृद्ध नागरिकासह 45 वर्षीय महिला व 32 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 44 व 35 वर्षीय महिला, संगमनेर खुर्दमधील 50 वर्षीय महिला, कोकणगाव येथील 34 वर्षीय महिला, निमज येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 35 वर्षीय तरुण व बारा वर्षीय मुलगी, खांजापूर येथील 35 वर्षीय महिला, सुकेवाडीतील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 51, 38 व 26 वर्षीय महिला, निमोण येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पारेगाव येथील 45 वर्षीय इसम, धांदरफळ खुर्दमधील 60 व 55 वर्षीय महिलांसह 51 वर्षीय इसम, 27 वर्षीय तरुण व 18 वर्षीय तरुणी, घुलेवाडीतील 38 वर्षीय महिलेसह नऊ वर्षीय मुलगा, निळवंडे येथील 21 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 73 वर्षीय महिलेसह 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सावरगाव तळ येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, राजापूर येथील 19 वर्षीय तरुणी, पिंपळगाव कांझिरा येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पिंप्रीलौकी येथील 70 वर्षीय महिला व मनोली येथील 75 वर्षीय इसमाचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 24 हजार 967 झाली असून तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या हजाराचा टप्पा ओलांडीत 1 हजार सातवर गेली आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील 402 जणांचा कोविडने बळी घेतला आहे.

प्रशासनाची जबाबदारी वाढली..
शनिवारपासून साकूरगटात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक पदाधिकार्‍यांनी रुग्णसंख्या कमी करण्याच्या प्रयत्नांना साथ दिल्याने दहा दिवसांच्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस बळाचा वापर करावा लागला नाही. नागरिकांनी स्वतःहून आपली दुकाने व आस्थापने बंद ठेवली आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपली जबाबदारी पूर्ण केली असून आता प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. रविवारपासून प्रशासनाने घरोघरी जावून तपासण्या करण्याचे काम सुरु केले असून लक्षणे असलेल्या अथवा आजारी असलेल्या रुग्णांच्या चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यातून चांगले परिणाम समोर येवून पठारभागातील वाढलेले संक्रमण कमी होईल असा विश्‍वास आहे. नागरिकांनीही कोणतीही लक्षणे असल्यास तत्काळ चाचणी करावी.
डॉ.शशीकांत मंगरुळे
प्रांताधिकारी, संगमनेर

Visits: 106 Today: 2 Total: 1116057

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *