संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येने आजही ओलांडली शंभरी! दहा दिवसांतील सरासरीत धक्कादायक वाढ; पठारभागातील संक्रमणाचा वेग उंचावलेलाच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील दहा दिवसांत ओसरलेली कोविड संक्रमणाची दुसरी लाट परतल्याचे चित्र निर्माण झाले असून पारनेरसह संगमनेर, पाथर्डी, कर्जत, श्रीगोंदा, जामखेड व शेवगाव तालुक्यात वेगाने सरासरीत बदल होत आहे. संगमनेर तालुक्याची सरासरी प्रतिदिवस 32 रुग्णांपर्यंत आल्यानंतर गेल्या दहा दिवसांत त्यात मोठी वाढ होवून आजच्या स्थितीत तालुक्याचा सरासरी रुग्णवाढीचा वेग थेट 70 रुग्णांवर तर मागील दहा दिवसांचा वेग 105 रुग्णांवर पोहोचला आहे. तालुक्याच्या पठारभागात वाढीस लागलेले संक्रमण आजही कायम असून साकूरसह पठारावरील 19 गावांमधून आजही 37 रुग्ण समोर आले आहेत. तर शहरातील सतरा जणांसह तालुक्यातून एकूण 125 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या वाढीव रुग्णसंख्येने तालुका आता 24 हजार 456 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.

शासन व प्रशासनाकडून वारंवार सूचना देवूनही काही नागरिकांच्या हलगर्जीपणाचा फटका संपूर्ण तालुक्याला भोगण्याची स्थिती पुन्हा एकदा निर्माण होवू लागली आहे. साकूरमध्ये कोविड नियमांची पायमल्ली करीत साजर्या झालेल्या सोहळ्यातून कोविडचा पुन्हा उद्रेक झाला आणि अखेर काही लोंकाचा हलगर्जीपणा साकूर जिल्हा परिषद गटातील जवळपास 20 गावांतील नागरिकांना भोगण्याची पाळी आली. गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढलेल्या पठारावरील रुग्णसंख्येने अवघ्या राज्याचे लख्य केंद्रीत केले आणि आज जिल्हाधिकार्यांना साकूरमध्ये धाव घेत पुढील दहा दिवस साकूर गटात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्याची वेळ आली. असे असूनही काही असंवेदनशील नागरिकांच्या मनोवृत्तीवर त्याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नसून आजही चोरुन-लपून धुमधडाक्यात कार्य उरकणार्यांची गडबड सुरुच असल्याचे दिसून येत आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेच्या अवघ्या दोन, खासगी प्रयोगशाळेच्या 49 व रॅपीड अँटीजेनच्या 74 अहवालांतून तालुक्यातील 125 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले. आज जिल्ह्यात केवळ संगमनेर आणि शेवगाव या दोनच तालुक्यातून तीन आकडी रुग्ण समोर आले आहेत. आजच्याही अहवालातून तालुक्याच्या पठारभागातील तब्बल 19 गावांमध्ये कोविडचा संसर्ग पसरून त्यातून 37 जणांना बाधा झाली. बुधवारच्या तुलनेत साकूरमधून आज अवघे सहा रुग्ण समोर आले आहेत. तर पठारासह तालुक्यातील 48 गावांना संक्रमणाची झळ बसली आहे. आज शहरातील सतरा जणांना कोविडची लागण झाल्याचेही समोर आले असून त्यात घोडेकर मळा येथील सात वर्षीय बालिकेसह संगमनेर असा पत्ता असलेल्या 58 व 50 वर्षीय इसमांसह 38, 36, 35, 34 वर्षीय दोन व 20 वर्षीय तरुण आणि 65, 55, 46, 45, 38, 36, 31 व 29 वर्षीय महिलांचा समावेश आहे.

पठारभागातील घारगाव येथील 57 वर्षीय इसमासह 28 वर्षीय तरुण, पिंपळगाव देपा येथील 65 वर्षीय महिलेसह 16 वर्षीय मुलगी, साकूर येथील 52 व 24 वर्षीय महिला, 11 वर्षीय मुलगी, 38, 32 व 25 वर्षीय तरुण, आंबी खालसा येथील 39 वर्षीय महिला, अकलापूर येथील 57, 50 व 48 वर्षीय इसम, जांबुत खुर्द येथील 47 वर्षीय महिला, मोधळवाडीतील 35 वर्षीय तरुण, बिरेवाडीतील 45 वर्षीय इसमासह 38 वर्षीय तरुण, कुरकुटवाडीतील 29 वर्षीय तरुण, नांदूर येथील 55 वर्षीय इसमासह 32 वर्षीय तरुण, डोळासणे येथील 48 वर्षीय महिला, हिवरगाव पठारावरील 16 वर्षीय मुलगी, जांभुळवाडीतील 14 वर्षीय मुलगा, कुंभारवाडीतील 14 वर्षीय मुलगी, म्हसवंडी येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 56 व 30 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगा व दोन वर्षीय बालक, जाचकवाडीतील 65 वर्षीय महिला, एठेवाडीतील 35 वर्षीय दोघी, 32 व 27 वर्षीय महिला, बोरबन येथील 32 वर्षीय तरुण व खंदरमाळ येथील 36 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.
तालुक्यातील अन्य 29 गावांमधूनही आज 71 रुग्ण समोर आले असून त्यात दाढ येथील 45 वर्षीय महिला व 29 वर्षीय तरुण, मालुंजे येथील 40 वर्षीय महिला व 24 वर्षीय तरुण, शिबलापूर येथील 34 व 19 वर्षीय तरुण, हंगेवाडीतील 50 वर्षीय इसम, डिग्रस येथील 58 वर्षीय महिला, निंभेरे येथील 25 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 67 वर्षीय महिला, पिंपरी येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40 व 23 वर्षीय तरुण, 21 वर्षीय तरुणी व 13 वर्षीय मुलगा, खांबे येथील 45 वर्षीय महिलेसह 18 वर्षीय दोन तरुण, प्रतापपूर येथील 50 वर्षीय महिला, ओझर येथील 17 वर्षीय तरुणी, उंबरी बाळापूर येथील 58 वर्षीय इसमासह 52, 28 व 27 वर्षीय महिला, 27 वर्षीय तरुण आणि 22 वर्षीय तरुणी, कौठे धांदरफळ येथील 56 व 42 वर्षीय महिलांसह 38 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 40 वर्षीय महिला, औरंगपूर येथील 52 वर्षीय इसम, पिंपळे येथील 40 वर्षीय महिला, पिंपरणे येथील 50 वर्षीय इसम,

समनापूर येथील 20 वर्षीय तरुणी, पानोडीतील 71, 65, 55 व 47 वर्षीय दोन महिला, 30 व 17 वर्षीय तरुण, 9 व 7 वर्षीय मुले, कनोली येथील 16 वर्षीय मुलगी, राजापूर येथील 59 वर्षीय इसमासह 27 वर्षीय महिला, शेडगाव येथील 41 वर्षीय तरुणासह सात वर्षीय मुलगा, कोकणगाव येथील 75 वर्षीय महिलेसह 35 व 31 वर्षीय तरुण, मंगळापूर येथील 36 वर्षीय दोन तरुण, घुलेवाडीतील 45 वर्षीय दोन महिलांसह 30 वर्षीय तरुण, कौठे कमळेश्वर येथील 80 वर्षीय वयोवृद्ध इसम, खळी येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 28 वर्षीय तरुण, 16 वर्षीय मुलगी व 15 वर्षीय मुलगा, आश्वी खुर्दमधील 39 व 32 वर्षीय तरुणांसह 35, 28 व 25 वर्षीय महिला आणि 19 वर्षीय तरुणी व चिंचोली गुरव येथील 55 वर्षीय इसमासह 42, 28 व 25 वर्षीय महिलांचा आजच्या बाधितांमध्ये समावेश आहे.

बुधवारच्या तुलनेत आज जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत काहीशी घट झाली असली तरीही ती क्षणीक ठरण्याची शक्यता असून जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात कोविड नियमांची पायमल्ली होत असल्याने संक्रमणाची सरासरी गती वाढल्याचे दिसून येत आहे. आज शासकीय प्रयोगशाळेच्या 127, खासगी प्रयोगशाळेच्या 373 व रॅपीड अँटीजेनच्या 420 अहवालातून जिल्ह्यातील 920 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात संगमनेर तालुक्यात सर्वाघीक 125, शेवगाव तालुक्यात 119, श्रीगोंदा तालुक्यात 91, पारनेर तालुक्यात 77, राहुरी तालुक्यात 69, जामखेड तालुक्यात 68, नगर ग्रामीणमध्ये 66, राहाता तालुक्यात 62, कर्जत तालुक्यात 54, कोपरगाव तालुक्यात 40, इतर जिल्ह्यातील 30, श्रीरामपूर तालुक्यात 27, अकोले व पाथर्डी तालुक्यात प्रत्येकी 26, नेवासा तालुक्यात 23 व अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 17 रुग्णांचा समावेश आहे. आज जिल्ह्यातील 786 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले तर नव्याने 920 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 97 हजार 242 झाली असून आजच्या स्थितीत जिल्ह्यातील 5 हजार 553 जणांवर उपचार सुरु असून गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

संगमनेरसह जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये धक्कादायकरितीने संक्रमणात वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज संगमनेर येथे भेट दिल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणार्या मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई ऐवजी महामारीचा प्रादुर्भाव संपेपर्यंत ‘सील’ करण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याचा पहिला धक्का आज शेवगाव शहरातील एका मंगल कार्यालवरील कारवाईद्वारे देण्यात आला असून सदर कार्यालयात नियमापेक्षा अधिक गर्दी आढळल्याने ते कार्यालय ‘सील’ करण्यात आले आहे. त्यासोबतच मंगल कार्यालयाच्या मालकासह नवदाम्पत्य आणि त्यांच्या आई-वडीलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरमध्ये घोषणा झालेल्या आदेशाची पहिली कारवाई शेवगाव तालुक्यात झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

