शिवसेनेचे विविध मागण्यांचे पालिकेला निवेदन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील विविध विकासकामांच्या मागण्यांचे निवेदन शिवसेनेने सोमवारी (ता.19) पालिका प्रशासनाला दिले. याद्वारे विकासकामे आणि लसीकरण तत्काळ करण्याचे सूचित केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात शिवसेनेतर्फे ‘शिवसंपर्क अभियान 2021’ सुरू असून पक्ष संघटना वाढविण्यासोबतच राज्यभरातील नागरिकांच्या समस्या, शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम या अभियानांतर्गत केले जात आहे. उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर शिवसेनेमार्फत प्रभाग दहाकडे (साईनगर, घोडेकर मळा) अनेक वर्षांपासून पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त केली आहे. तसेच बंदिस्त गटार, खड्डेमय-चिखलमय रस्ते, अपुर्या सुविधा, सुशोभिकरण, उद्यान, व्यायामशाळा आदिंकडे लक्ष देवून प्राधान्याने लसीकरण करण्याची मागणी पदाधिकार्यांनी केली आहे.
