जिल्ह्यात रविवारी 758 रुग्ण सापडले

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याच्या भ्रमात असतानाच रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे. रविवारी (ता.18) प्राप्त झालेल्या अहवालांतून जिल्ह्यातील 758 जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर यामध्ये संगमनेर तालुक्यातून उच्चांकी 119 रुग्ण समोर आले असून, तालुक्याची रुग्णसंख्या 23 हजार 927 वर पोहोचली आहे.

रविवारी मिळालेल्या अहवालावरुन संगमनेर तालुका अग्रस्थानी असून 119 रुग्ण आढळले आहेत. तर त्याखालोखाल पाथर्डी 86, पारनेर 78, कर्जत 77, शेवगाव 54, महानगरपालिका हद्द व अकोले प्रत्येकी 46, नेवासा 43, श्रीगोंदा 36, कोपरगाव 35, श्रीरामपूर 34, राहाता, नगर ग्रामीण व जामखेड प्रत्येकी 25, राहुरी 18, भिंगार कॅन्टोन्मेट 1 आणि इतर जिल्ह्यातील 10 असे एकूण 758 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध कायम केले आहेत. तरी देखील नागरिक व व्यावसायिकांकडून सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेवून कडक पावले उचलण्याची गरज आहे.

Visits: 99 Today: 1 Total: 1112398

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *