युवकांच्या वाहनाला अपघात; एक ठार, चौघे जखमी

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील खडका फाटा येथून भीमाशंकरला गेलेल्या युवकांच्या वाहनाला अपघात होऊन त्यात 22 वर्षीय युवा हॉटेल व्यावसायिक अमोल लोखंडे हे जागीच ठार झाले. तर इतर चौघे जखमी झाले आहेत.

शुक्रवारी (ता.16) रात्री 10 वाजेच्या सुमारास अमोल लोखंडे हे आपले मित्र दत्तात्रय मैराळ, कांचन भांगे, मनोज शिंदे, नितीन निपुंगे यांच्या समवेत स्वीफ्ट कारने (क्र.एमएच.43, आर.6423) भीमाशंकर येथे दर्शनासाठी गेले होते. रात्री 11.30 ते 12 वाजण्याच्या सुमारास आळेफाटा ते ओतूर रस्त्यावरील आणे घाटावर पडलेल्या दरडीला ही कार धडकली व पुढे जाऊन उलटली. यामध्ये अमोल लोखंडे याचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील अन्य युवक जखमी झाले. जखमींना अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तर अमोल लोखंडे यांचा मृतदेह दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या खडका फाटा रस्त्यावरील निवासस्थानी आणण्यात आला. शोकाकूल वातावरणात अंत्यसस्कारं करण्यात आले. मयत लोखंडे याच्या पश्चात आई, वडील, बहीण भाऊ, आत्या, चुलते असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने नेवासा शहर व खडका फाटा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Visits: 163 Today: 3 Total: 1589468

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *