अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला पाऊस गाण्यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत घेतला मैत्रीचा आनंद

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोच उपक्रमाअंतर्गत मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात अधिक भर पडावी, यादृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांसमवेत सध्याच्या पावसाळा ऋतूतील छान छान बालगीतांचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला.

संगमनेर तालुक्यातील अंभोरे, पिंपरणे, जाखुरी, देवगाव व वस्तीशाळांमधील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसमवेत अमृतवाहिनी मॉडेल स्कूलचे विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन पावसात उभे राहून विविध गाण्यांचा आनंद घेतला. यावेळी शरयू देशमुख, गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शोभा हजारे, अनुपमा रहाणे, अंभोरे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नन्नवरे, किसन खेमनर, पिंपरणे शाळेचे संजय बोरसे, प्रदीप बागुल, जाखुरी शाळेच्या रूपाली देशमुख, देवगाव शाळेच्या विजया शिंदे व गीतकार आणि संगीतकार प्रकाश पारखे आदी उपस्थित होते.

सध्या राज्यात सर्वत्र पावसाळ्याचे छान हिरवेगार वातावरण आहे. या वातावरणात विविध गावांमध्ये जाऊन मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद घेतला. याप्रसंगी प्रकाश पारखे यांनी पावसांचे विविध गिते गायली, धो धो पाऊस पडतोय रे, रिमझिम पाऊस अशा विविध गीतांनी विद्यार्थ्यांना पावसात भिजण्यास उत्साहित केले. जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या बरोबर या विद्यार्थ्यांची मैत्री व सहकार्याची भावना वाढावी, विचारांची देवाण-घेवाण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अतिशय गंमतीदार आणि संस्मरणीय ठरला.

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता ही कौतुकास्पद ठरली आहे. या शाळांमधूनही अनेक गुणवंत विद्यार्थी निर्माण होत आहे. मॉडेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सातत्याने वाव दिला जात असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची त्यांची मैत्री व्हावी. ग्रामीण जीवनाशी त्यांचा अधिक संपर्क यावा या भावनेतून पाऊस गाण्यांचा या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे विश्वस्त शरयू देशमुख यांनी सांगितले. शीतल गुंजाळ व सुषमा क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. अनिता सानप, वर्षा रहाणे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *