आधुनिक पद्धतीने शेती केल्यास कुटुंबाची प्रगती होते ः थोरात जयहिंद लोकचळवळीकडून प्रगतिशील युवा शेतकर्यांचा सन्मान
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र शेतीमध्ये पारंपारिकता सोडून ती आधुनिक व व्यावसायिक पद्धतीने केल्यास नक्कीच त्या कुटुंबाची मोठी प्रगती होईल, असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील के. बी. दादा सभागृह येथे जयहिंद लोकचळवळ व जयहिंद फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्यावतीने संगमनेर तालुक्यातील कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या तेरा प्रगतिशील युवा शेतकर्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, हिरालाल पगडाल, सुहास आहेर, प्रा. बाबा खरात, रवींद्र लेंडे, सतीश वामन, प्रफ्फुल थोरात, जीवन लांडगे, अजय फटांगरे, सुभाष सांगळे, विष्णूपंत रहाटळ, रमेश गुंजाळ, मीनानाथ वर्पे, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, प्रकल्प प्रमुख डॉ. अभयसिंह जोंधळे, सुनीता कांदळकर, सौदामिनी कान्होरे, अर्चना बालोडे आदी उपस्थित होते.
हे आहेत पुरस्कारार्थी…
कुक्कुटपालन-राजेंद्र कहांडळ (देवकौठे), डाळिंब व गो-पालन-कैलास सांगळे (देवकौठे), डाळिंब व टोमॅटो-सुधीर शेळके (बोटा), सीताफळ-पपई-शिमला मिरची-ज्ञानेश्वर देवकर (आभाळवाडी), शेळीपालन-विमल डोळझाके (हिवरगाव पठार), डाळिंब-ऊस-कांदा-सुरेश गाडेकर (आंबीखालसा), फुलोत्पादन-कपिल गुंजाळ (खांडगाव), कांदा-डाळिंब-भुईमूग- गोपीनाथ गोडसे (गोडसेवाडी), टोमॅटो-बटाटा-गोपीनाथ भोजने (शिरसगाव), ऊस-डाळिंब-अॅप्पल बोर-उज्ज्वला देशमुख (जवळेकडलग), गो-पालन रमेश कांदळकर (तळेगाव दिघे), कुक्कुटपालन-अश्विनी खिलारी (चिंचोली गुरव), ऊस-दूध शिवाजी तांबे (चिंचपूर) यांचा सपत्नीक शाल, फेटा, सन्मानचिन्ह व महिलांना साडी व आंबा वृक्ष रोप देवून सन्मान करण्यात आला.