कोरोना संकटात परिचारिकांचे काम कौतुकास्पद ः आ. डॉ. तांबे ग्राहक समिती आणि शांती फाऊंडेशनकडून परिचारिकांचा गौरव
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोनाच्या काळात माणुसपणाचे दर्शन घडले. त्याप्रमाणे काहींनी आपल्यातील राक्षसाचे प्रदर्शन केले आहे. मात्र, याकाळात परिचारिकांनी केलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
ग्राहक उपभोक्ता समिती आणि शांती फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित परिचारिका शौर्य सन्मान सोहळ्यात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील, ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ मुटकुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया उपस्थित होते.
परिचारिका हा वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाचा घटक आहे. महामारीच्या काळात न घाबरता अतुलनीय असे शौर्य त्यांनी दाखविले आहे. त्यांनी महामारीला सामोरे जाण्यासाठी जे कार्य केले आहे त्याचे कौतुक करण्यासाठीचा हा सोहळा म्हणजे कृतज्ञता असल्याचे आमदार डॉ. तांबे म्हणाले. नगराध्यक्षा दुर्गा तांबे परिचारिकांनी अगदी समर्पित भावनेने काम केले असल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन संदीप वाकचौरे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. मुटकुळे यांनी केले. आभार वंसत बंदावणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब राऊत, अरूण देशमुख, सूर्यकांत शिंदे, गोरक्षनाथ मदने, डॉ. किशोर पोखरकर, शांताराम डोंगरे, किशोर डोंगरे, बाळासाहेब घुले, विलास वर्पे आदिंनी प्रयत्न केले.
सन्मानार्थी…
प्रतीक्षा गुंजाळ, गौरी वाडेकर, अंजली मिसाळ, दीक्षा नेहे, रेश्मा जाधव, सपना गडगे, सुरेखा जोंधळे, ऋतुजा रणधीर, आरती रायभाने, गौरी गंभिरे, रोहिणी खैरे, सुशिला कोल्हे, सुविधा कुळधरण, वैशाली भोसले, सुनंदा होडकर, लता वाकचौरे, गंगुबाई मधे, अस्मिता पगारे, ज्योती वासलकर, भाग्यश्री खरात, मनीषा राऊत, प्रतीक्षा गायकवाड, मनीषा पडवळ, मंगल शेटे, द्रोपदा धनकुटे, दीप्ती फटांगरे, प्रमिला सोनवणे, पूजा कातोरे, सविता देशमुख, भाग्यश्री बांबळे, सुजाता भोये यांच्यासह डॉ. सीमा घोगरे, डॉ. संदीप कचेरिया यांना प्रमाणपत्र, पुस्तके आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले.