‘यशोधन’मध्ये जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी मदत केंद्र सुरू

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोनाच्या वाढत्या संकटात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने मदतीकरिता कृतिशील उपाययोजना केल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना तातडीने मदत मिळणेकरिता संगमनेर येथील यशोधन कार्यालयात 24 तास कार्यरत हेल्पलाईन सुविधा नुकतीच कार्यान्वित केली आहे.

‘यशोधन’ मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय येथे आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा कोरोना मदत व सहाय्यता केंद्र या कोरोना वॉर रुमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष किरण काळे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, शहराचे युवकाध्यक्ष निखील पापडेजा, प्रा.बाबा खरात, नवनाथ महाराज आंधळे, सचिन खेमनर, पी.वाय.दिघे, विजय हिंगे आदी उपस्थित होते. या 24 तास हेल्पलाईन केंद्रामुळे विविध तालुक्यांतील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना साधे बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड उपलब्धतेसाठी मदत मिळणे, रुग्णवाहिका, प्लाझ्मासाठी मदत, रुग्णांसाठी औषधे मिळणे अशा विविध सुविधांसाठी तत्परतेने मदत केली जाणार आहे.

या क्रमांकांवर करावा संपर्क..
संगमनेर, अकोले, कोपरगाव व राहाता या तालुक्यांसाठी 9370589017 व 8446525901 तर नगर, राहुरी, अहमदनगर शहराकरिता 9370693309 व 9370577868 तसेच कर्जत, जामखेड, श्रीगोंदा व पारनेर या तालुक्यांकरिता 9370841417 व 9370839096 आणि पाथर्डी, शेवगाव, नेवासा व श्रीरामपूर या तालुक्यांकरिता 9370682375 व 9370877503 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Visits: 8 Today: 1 Total: 117315

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *