राहात्यात अनैतिक संबंधातून एकाचा खून
![]()
नायक वृत्तसेवा, राहाता
शहरात अनैतिक संबंधातून राहाता शहरातील पिंपळस परिसरात एका इसमाची हत्या करण्यात आली असून दुसर्याला गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी रात्री (ता.10) घडली आहे.

याबाबत राहाता पोलिसांत श्याम जेजूरकर (वय 26, नायगाव, ता.सिन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी संध्याकाळी पाच ते साडेसात वाजेच्या सुमारास प्रवीण बाळकृष्ण बनकर आणि त्याचा भाऊ सचिन बाळकृष्ण बनकरसह इतर दोघे अनोळखी इसमांनी एका तरुणीशी राहुल जेजूरकर यांच्यात अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन शहरातील पिंपळस परिसरात बोलावून घेतले. त्यावेळी राहुल जेजूरकर व श्याम जेजूरकर यांना लाकडी दांड्याने मारहान करुन गंभीर जखमी केले. घटनेनंतर जखमींना शिर्डीच्या साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारांकरिता दाखल केले असता राहुल जेजूरकर याचा उपचारादरम्यान मुत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषित केले. यावरुन पोलिसांनी आरोपींविरोधात जीवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये हे करीत आहे.

