शेळकेवाडी येथे शेतकर्‍याचा वीजेचा धक्का बसून मृत्यू

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या शेळकेवाडी येथील तरूण शेतकर्‍याचा वीजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर घटना रविवारी (ता.11) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. अमोल दत्तात्रय शेळके (वय 35) असे मृत्यू झालेल्या तरूण शेतकर्‍याचे नाव आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अमोल शेळके हा तरूण शेतकरी रविवारी सायंकाळी विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेला होता. त्याचवेळी त्याला वीजेचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर त्यास उपचारार्थ घारगाव येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी देविदास शेळके यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश लोंढे हे करत आहे. दरम्यान, मयत अमोल शेळके हा तरूण शेतकरी परिसरात सर्वांना परिचित होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबासह शेळकेवाडी गावावर शोककळा पसरली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Visits: 282 Today: 1 Total: 2125053

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *