रोटरीच्या शिबिरात चाळीस दात्यांचे रक्तदान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सामाजिक कार्यात जगभर अग्रेसर असणार्‍या रोटरी क्लब संगमनेरतर्फे नुकतेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांचे हस्ते झाले होते. यामध्ये चाळीस दात्यांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्ताची मागणी वाढत चालली आहे, अशा परिस्थितीत रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे महत्वाचे आहे. रोटरी क्लब ऑफ संगमनेर तर्फे अर्पण रक्तपेढीच्या सहयोगाने दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. यावर्षी ते मोठ्या उत्साहात पार पडले. रक्तदान करणार्‍या दात्यांना यावेळी यूनायटेड इंडिया इन्श्युरन्सचे विकास अधिकारी रवी पवार यांच्यातर्फे 1 लाखांचा अपघाती विमा देण्यात आला. याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष योगेश गाडे, सचिव ऋषीकेश मोंढे, प्रकल्प प्रमुख डॉ. विकास करंजेकर, डॉ. सुजय कानवडे, रोटरी आय केअरचे अध्यक्ष नरेंद्र चांडक, उपाध्यक्ष महेश वाकचौरे, पवनकुमार वर्मा, अजित काकडे, ओंकार सोमाणी, डॉ. प्रमोद राजूस्कर, सुनील घुले, अमित पवार, संजय कर्पे, आनंद हासे, इनरव्हील डिस्ट्रिक्टच्या उपाध्यक्षा रचना मालपाणी, संगमनेरच्या अध्यक्षा डॉ. दीपाली पानसरे, प्रकल्प प्रमुख सुनीता गाडे, नेहा सराफ, वैशाली खैरनार, सुनीता गांधी, रोटरॅक्टचे अध्यक्ष अभिजीत कर्पे व इतर रोटरी सदस्य उपस्थित होते. प्रकल्प यशस्वीतेसाठी रोटरी आय हॉस्पिटलचे डॉक्टर्स, सर्व कर्मचारी व रोटरी क्लब ऑफ संगमनेरच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Visits: 3 Today: 1 Total: 30416

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *