तंत्रज्ञानाद्वारे एकरी उसाचे उत्पादन वाढवा ः थोरात विक्रमी उत्पादन घेणार्या शेतकर्यांचा सत्कार
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिले तर नवीन रोजगाराबरोबर उत्पादकता वाढण्यासाठी मोठी मदत होईल. याकरिता सर्व शेतकर्यांनी कमी क्षेत्रात, कमी पाण्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त एकरी उत्पादन वाढवावे, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर सन 2019-20 या हंगामात विक्रमी उत्पादन घेणार्या शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ हे होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. माधव कानवडे, उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक गणपत सांगळे, चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, संपत गोडगे, मीनानाथ वर्पे, डॉ. तुषार दिघे, भाऊसाहेब शिंदे, माणिक यादव, संभाजी वाकचौरे, दादासाहेब कुटे, सुरेश झावरे, भास्कर आरोटे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर घुगरकर आदी उपस्थित होते. तसेच यावेळी सेवानिवृत्त 41 कर्मचार्यांना अमृतमंथन व अमृत गाथा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर भोकनळ रवींद्र दगडू (निमज), पवार रोहिदास निवृत्ती (राजापूर), गोपाळे भास्कर पाटीलबा (सुलतानपूर), वर्पे मुरलीधर सावळेराम (कनोली), गुंजाळ लक्ष्मण भाऊसाहेब (खांडगाव), देशमुख त्र्यंबक व्यंकट (मंगळापूर), येवले भाऊसाहेब बाबुराव (मेहेंदुरी), शिंदे जिजाभाऊ जानकू (ओझर खु.), वर्पे शिवाजी विश्राम (संगमनेर खु.), बंगाळ दगडू लक्ष्मण (मेहेंदुरी), नवले सुधाकर काशिनाथ (औरंगपूर), आरोटे भास्कर पांडुरंग (मेहेंदुरी) या शेतकर्यांना सन्मानचिन्ह, अमृतमंथन व अमृत गाथा पुस्तक, कलमी आंब्याचे रोप व रोख रकमेने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.