आमदार गायकवाडांवर कारवाई करा; लहुजी सेनेची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मागासवर्गीय समाजाबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य करुन संविधानाचा अपमान केला आहे. यामुळे त्यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हा दाखल करावा, अशी मागणी क्रांतीवीर लहुजी सेनेने केली आहे.

याबाबत संगमनेरचे नायब तहसीलदार सुभाष कदम यांना मंगळवारी (ता.6) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी खामगाव मतदारसंघामध्ये दोन गटांत वाद झाल्याप्रकरणी वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांनी संविधानाचा अपमान केला आहे. याचा निषेध करुन त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई करावी, अशी मागणी क्रांतीवीर लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ बलसाने, संजय बलसाने, सुनील फुलसुंदर, विकास जाधव, सागर तुपसुंदर, सुधीर जोर्वेकर, संजय दिघे आदिंनी केली आहे.

Visits: 174 Today: 1 Total: 2167501

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *