केलवडमध्ये अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू
![]()
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील केलवड येथे वीज अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता.28) सायंकाळी घडली आहे.

केलवड येथील ताई शिवाजी रजपूत (वय 35) असे मयत महिलेचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी पावणे सात वाजेच्या पूर्वी तिच्या अंगावर वीज पडल्याने गंभीर जखमी झाली. त्यानंतर तत्काळ तिच्या नातेवाईकांनी राहाता ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता औषधोपचारांपूर्वीच मयत असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषित केले. या प्रकरणी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या खबरीवरून राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. बी. नरोडे हे करत आहे.
Visits: 115 Today: 1 Total: 1114009

