टाकळीभान येथील पेट्रोल पंप चालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
पावसाचे पाणी अंगणात साचल्याने त्यात चार वर्षांची मुलगी बुडाली. या पाण्याला वाट काढून देण्यासाठी अडथळा ठरणारे दगड गोटे काढण्यास गेलेल्या महिलांना शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी टाकळीभान (ता.श्रीरामपूर) येथील पेट्रोलपंप चालक पोपट बारहाते यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रविवारी सायंकाळी झालेल्या पावसाचे पाणी पेट्रोलपंशेजारी राहणार्‍या कुटुंबांच्या अंगणात साचले होते. या साचलेल्या पाण्यात एक 4 वर्षांची मुलगी बुडाली होती. तिला पाण्याबाहेर काढून साचलेले पाणी काढून देण्यासाठी अडथळा ठरणारे दगड गोटे काढण्यासाठी फिर्यादी महिला व तिची सासू गेल्या होत्या. त्यावेळी पेट्रोलपंप चालक पोपट बारहाते त्याठिकाणी आला व म्हणाला, तुम्ही येथील दगडगोटे काढू नका. त्यावर फिर्यादी महिला म्हणाली, आमच्या दारात खूप पाणी साचले आहे ते काढून देतो. त्याचा बारहाते यांना राग आल्याने शिवीगाळ करून फिर्यादी महिलेचा उजवा हात धरून पिरगाळला व हाताच्या चापटीने मारहाण करीत फिर्यादी महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या सासूलाही दगडावर ढकलून देऊन जखमी केले. यावरुन पोलिसांनी पोपट बारहाते याच्या विरोधात भा.दं.वि. कलम 354, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. आयुब शेख हे करत आहे.

Visits: 173 Today: 1 Total: 2177264

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *