थोरात कारखान्याचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम दिशादर्शक : थोरात दररोज शंभर रुग्णांना पुरेल इतक्या ऑक्सिजनची होणार निर्मिती..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना संकट अद्याप संपलेले नाही. प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेची असून सहकारमहर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधव कानवडे, शिवाजी थोरात, उपाध्यक्ष संतोष हासे, लक्ष्मण कुटे, शंकर खेमनर, अमित पंडित, आर. बी. रहाणे, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, अर्चना बालोडे, निर्मला गुंजाळ, गणपत सांगळे, रामदास वाघ, विष्णूपंत रहाटळ, साहेबराव गडाख, दत्तू खुळे, सुरेश झावरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. टास्क फोर्सच्या मते तिसरी लाट येण्याचा मोठा धोका आहे. यामध्ये राज्यात 50 लाख रुग्ण असू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेची आहे. दुसर्‍या लाटेमध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे राज्य सरकारने तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले असून यामध्ये राज्यातील 23 सहकारी साखर कारखान्यांनी सहभाग घेतला आहे. साखर कारखान्यांमधून थोरात कारखाना हा तिसरा ऑक्सिजन निर्मिती करणारा कारखाना ठरला आहे. कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम केले असून मागील कोरोना लाटेमध्ये 500 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करताना सर्व सहकारी संस्थांनी अत्यंत मदतीच्या भावनेतून काम केले असल्याचे महसूल मंत्री थोरात यांनी नमूद केले.


दरम्यान, या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामधून दररोज 850 किलो ऑक्सिजन निर्माण होणार असून 100 रुग्णांना पुरेल इतका हा ऑक्सिजन आहे. सुरेश थोरात, सुभाष सांगळे, संचालक इंद्रजीत खेमनर, चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, मीनानाथ वर्पे, अभिजीत ढोले, संपत गोडगे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, माणिक यादव, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे, संतोष मांडेकर, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, सौदामिनी कान्होरे, रामदास तांबडे, किरण कानवडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले.

Visits: 22 Today: 2 Total: 115809

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *