हिवरगाव पठार येथून दोन दुचाकींची चोरी! परिसरात भीतीचे वातावरण; कौठे मलकापूर येथूनही दुचाकीची चोरी

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथून दोन दुचाकी चोरून चोरट्यांनी पोबारा केल्याच्या घटना सोमवारी (ता. 11) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडल्या आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच कौठे मलकापूर येथूनही दुचाकीची चोरी झाल्याचे समजते.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साकूर येथील नारायण रभाजी डोके यांची (एमएच. 17, एएच. 4527) व विलास केकाण यांची (एमएच. 17, बीएच. 0106) दुचाकी अज्ञात चोरट्यांनी हिवरगाव पठार अंतर्गत असलेल्या खाडे वस्तीवरील मोकळ्या माळरानावर तमाशाच्या मंचाजवळून चोरून नेल्या आहेत. आपल्या दुचाकी चोरी गेल्याचे डोके व केकाण यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दुचाकींचा सर्वत्र शोध घेतला; मात्र त्या कुठेच मिळून आल्या नाहीत.

याप्रकरणी नारायण डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 106 / 2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर. व्ही. भुतांबरे हे करत आहे. दरम्यान पाच ते सहा दिवसांपूर्वीच कौठे मलकापूर येथील बिजू मुरलीधर परचंडे यांचीही (एमएच. 17, वाय. 8973) ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. त्यामुळे आता दुचाकीस्वारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Visits: 225 Today: 1 Total: 2126519

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *