श्रीरामपूर भाजपचे शनिवारी शहरात चक्का जाम आंदोलन ओबीसींच्या न्याय हक्कासाठी राज्य सरकारला करणार जागे

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
ओबीसींच्या न्याय हक्कासाठी भाजपच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एकाच वेळी एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. श्रीरामपूर शहरातील शिवाजी चौकातही शनिवारी (ता.26) सकाळी 11 वाजता हे आंदोलन होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष मारुती बिंगले यांनी दिली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात बिंगले यांनी म्हटले आहे की, तिघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या न्याय हक्काचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. ते पुनःप्रस्थापित होण्यासाठी झोपलेल्या सरकारला जाग आणण्याकरिता शनिवारी शिवाजी चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. तरी यावेळी भाजप कार्यकर्ते व भाजपप्रेमींनी सकाळी 11 वाजता चौकात जमा व्हावे असे आवाहन बिंगले यांनी केले आहे.

तरी या आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गणेश राठी, सुनील वाणी, तालुकाध्यक्ष बबन मुठे, सतीश सौदागर, राम तरस, अनिल भनगडे, ओबीसी शहराध्यक्ष प्रवीण बोराडे, चंद्रकांत परदेशी, मिलिंद साळवे, अरुण धर्माधिकारी, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा संयोजक विठ्ठल राऊत, सांस्कृतिक आघाडीचे बंडूकुमार शिंदे, औद्योगिक आघाडीचे जिल्हा संयोजक सुनील चंदन, युवा मोर्चाचे अक्षय वर्पे, विशाल यादव, रुपेश हारकल, विशाल अंभोरे, ओबीसी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पुष्पलता हरदास, ओबीसी महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा किरण सोनवणे आदिंनी केले आहे.

Visits: 79 Today: 2 Total: 1112671

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *