जिल्ह्याच्या कोविड संक्रमणात झाली आजही मोठी वाढ! जामखेड तालुक्यात उद्रेक; संगमनेर तालुक्यातील सरासरी रुग्णसंख्येतही पडली भर..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील कोविड संक्रमणातील चढउतार आजही कायम असून गुरुवारी पाचशेच्या खाली आलेली रुग्णसंख्या आज पुन्हा वाढली असून जिल्ह्यात आज तब्बल 586 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात आज कोविडचा उद्रेक झाला असून तेथील 80 जणांना संक्रमण झाले आहे. त्यासोबतच संगमनेर, अकोले, कर्जत व राहुरी तालुक्यातील रुग्णांचे आकडेही फुगले आहेत. आजही संगमनेर शहरातील अवघ्या एकासह ग्रामीणभागातील 63 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तालुक्याच्या पठारभागातील संक्रमणाची गती अजूनही टिकून असून आज पठारावरील नऊ गावांमधून 21 रुग्ण आढळले आहेत. आजच्या वाढलेल्या रुग्णसंख्येने संगमनेर तालुका आता 23 हजार 717 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.
जिल्ह्यात सध्या तिसर्या स्तरावरील निर्बंध लागू असल्याने सायंकाळी चारनंतर बाजारपेठा बंद होतात. मात्र या निर्बंधांना नागरिक जुमानीत नसल्याचे चित्र रोजच्या वाढत्या रुग्णसंख्येतून समोर येवू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा पुन्हा एकदा संक्रमणाच्या दिशेने आघाडी घेवू लागल्याची चिंताजनक स्थिती निर्माण होवू पहात आहे. सध्या सुरु असलेले विवाह सोहळे नियमांना तिलांजली वाहत असल्याने ग्रामीणभागातील संक्रमणाने वेग घेतल्याचे समोर येत आहे. आज जिल्ह्यात जामखेडसह संगमनेर, अकोले, कर्जत व राहुरी तालुक्यातील रुग्ण वाढले आहेत, तर केवळ अहमदनगर तालुक्यातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. उर्वरीत सर्व तालुक्यात सरासरी इतके रुग्ण आढळले आहेत. रुग्णवाढीचा वेग असाच चढता राहील्यास लवकरच जिल्ह्यात तिसर्या लाटेचे पदार्पण होण्याची शक्यताही आता वैद्यकीय जाणकार व्यक्त करु लागले आहेत.
गुरुवारी खाली आलेली संगमनेर तालुक्यातील सरासरी रुग्णगती आज पुन्हा वाढली असून तालुक्यातून दररोज 46 रुग्ण समोर येत आहेत. आजही खासगी प्रयोगशाळेच्या 24 व रॅपीड अँटीजेनच्या 39 निष्कर्षातून संगमनेर शहरातील रहेमतनगर परिसरातील 40 वर्षीय महिलेसह ग्रामीणभागातील 63 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातही पठारभागात वाढलेले संक्रमण आजही कायम असल्याचे समोर आले आहे. आजच्या अहवालातून निमोण येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, संगमनेर खुर्द मधील 31 वर्षीय महिला, आश्वी बु. येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, वरवंडी येथील 19 वर्षीय तरुण, ओझर खुर्द येथील 55 वर्षीय इसम, 45 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुण, आठ वर्षीय मुलगा व पाच वर्षीय मुलगी, उंबरी बाळापूर येथील 65 व 45 वर्षीय महिलांसह 35 वर्षीय तरुण,
आंबी दुमाला येथील 80 वर्षीय महिलेसह 51 व 48 वर्षीय इसम, 16 व 8 वर्षीय मुली, घारगाव येथील 65 वर्षीय महिला, मांडवे बु. येथील 41, 31 व 29 वर्षीय तरुण व 11 वर्षीय मुलगा, बिरेवाडीतील 53 वर्षीय महिला, शिंदोडी येथील 52 वर्षीय महिला, जांबुत येथील 78 वर्षीय महिला, कालेवाडीतील 35 वर्षीय महिला, साकूर येथील 50 वर्षीय इसम, माळवाडी येथील 80 व 34 वर्षीय महिला, 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 47 वर्षीय इसम, 35 वर्षीय तरुण व 16 वर्षीय मुलगी, दाढ येथील 31 वर्षीय तरुणासह 15 वर्षीय मुलगा, धांदरफळ बु. येथील 30 वर्षीय महिलेसह तीन वर्षीय बालक, सावरचोळ येथील 59 वर्षीय इसम, निमगाव खुर्दमधील चार वर्षीय बालिका, लोहारे येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह आठ वर्षीय मुलगा, खांडगाव येथील 28 व 23 वर्षीय तरुण, आश्वी खुर्दमधील 55 वर्षीय इसमासह 29 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 30, 28 व 24 वर्षीय तरुणांसह सात वर्षीय मुलगी व पाच वर्षीय मुलगा, पानोडी येथील 55, 35 वर्षीय दोन, 30 व 23 वर्षीय महिला, 22 व 18 वर्षीय तरुणी, 38 वर्षीय तरुण, 15 वर्षीय मुलगी व 14 वर्षीय मुलगा आणि कोल्हेवाडी येथील 50 वर्षीय इसमासह 25 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 23 हजार 717 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.
आज जिल्ह्याच्या रुग्णसंख्येतही जवळपास शंभरने वाढ झाली. त्यातही जामखेड तालुक्यातील रुग्णसंख्येने आज उसळी घेत थेट 80 रुग्णसंख्येवर उडी घेतली. त्या खालोखाल पारनेर 64, संगमनेर 63, पाथर्डी 56, राहाता व शेवगाव प्रत्येकी 49, अकोले 33, नगर ग्रामीण 30, कर्जत 29, नेवासा व श्रीगोंदा प्रत्येकी 23, राहुरी 22, अहमदनगर महापालिका क्षेत्र 19, कोपरगाव 16, श्रीरामपूर 15, इतर जिल्ह्यातील दहा व भिंगार लष्करी परिसरातील पाच रुग्णांचा समावेश आहे. आज वाढलेल्या रुग्णसंख्येने जिल्हा आता 2 लाख 87 हजार 445 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.