जिल्ह्यात आजही उच्चांकी रुग्णवाढ; एकूण रुग्णसंख्या लाखाच्या पार! पोलीस निरीक्षक आणि विद्यमान नगरसेविकेसह संगमनेरातही दिडशेहून अधिक बाधित..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर जिल्ह्याला बसलेला कोविडचा विळखा आज आणखी घट्ट झाला असून जिल्ह्यात आजवरची उच्चांकी रुग्णसंख्या समोर आली आहे. कोविडचा उद्रेक झालेल्या जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये गेल्या तीन दिवसांतील आकडेवारीने भर घातली असून पाथर्डी, नेवासा, राहुरी, अकोले, जामखेड व कर्जत तालुक्यातील सरासरी दुपटीने वाढली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याची अवस्था अत्यंत चिंताजनक बनली असून शासकीय प्रयोगशाळेकडील प्रलंबित अहवालांची संख्या लक्षात घेता पुढील महिनाभर रुग्णवाढीच्या आकड्यांची एकमेकांशी सुरु असलेली स्पर्धा अशीच टिकून राहणार असल्याचा अंदाज आहे. आज जिल्ह्यात एकूण 1 हजार 996 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून संगमनेर तालुक्यात तब्बल 154 बाधित आढळले आहेत. असे असूनही संगमनेरातील आजची रुग्णवाढ पाचव्या क्रमांकाची असल्याने जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव किती वेगाने होतोय याचा सहज अंदाज बांधता येईल. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची रुग्णसंख्या लाखाच्या पार पोहोचली असून संगमनेर तालुका आता 8 हजार 788 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. संगमनेरातील सक्रीय संक्रमितांची संख्या 537 इतकी आहे.

एप्रिलच्या पहिल्या दिवसापासून चढाला लागलेला कोविड अद्यापही वेगातच असून आजही जिल्ह्यातील 1 हजार 996 जणांचे अहवाल संक्रमित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्याची कोविड स्थिती आणखी चिंताजनक बनली असून आरोग्य यंत्रणांवरील ताण आणखी वाढला आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालातून अहमदनगर खालोखाल कोपरगाव तालुक्यातील संक्रमणात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले असून राहाता, श्रीरामपूर व संगमनेर तालुक्यातील रुग्णगतीही टिकून आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकसारखी वाढ होणार्या या तालुक्यांच्या पंक्तित आता पाथर्डी, नेवासा व राहुरी तालुक्यांचाही समावेश झाला असून गेल्या तीन दिवसांत या सर्वच तालुक्यांमधून मोठ्या÷संख्येने रुग्ण समोर आले आहेत.

गेल्या दिड महिन्यापासून सुरु झालेल्या जिल्ह्यातील कोविडच्या दुसर्या संक्रमणाने आता चांगलाच वेग घेेतला असून गेल्या तीन दिवसांत तर विक्रमी संख्येने रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण कोविडच्या दहशतीखाली आले असून शासनाकडून कठोर निर्बंध लागू करण्यास सुरुवात झाल्याने मोठ्या उपस्थितीच्या उद्योगांना मर्यादा लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळेे सर्वसामान्यांसमोर पुन्हा एकदा रोजीरोटीचा प्रश्न उभा राहण्याची भिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असल्याने शासकीय कोविड आरोग्य केंद्रातील खाटा फुल्ल झाल्या आहेत, त्यामुळे सामान्य नागरिकांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयांची दारे वाजवावी लागत असून कोविडचा ‘धंदा’ पुन्हा एकदा जोमात आला आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेचे 823, खासगी प्रयोगशाळेचे 902 व रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा प्राप्त झालेल्या 271 अहवालातून जिल्ह्यातील 1 हजार 996 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. यात अन्य जिल्ह्यातील 19 तर अन्य राज्यातील दोघा रुग्णांचा समावेश आहे. आजच्या अहवालात जिल्ह्यातील सर्वाधीक 476 रुग्णांची वाढ एकट्या अहमदनगर महापालिका क्षेत्रात झाली असून त्या खालोखाल कोपरगाव 202, राहाता 195, श्रीरामपूर 193, संगमनेर 154, पाथर्डी 140, जामखेड 94, नगर ग्रामीण 93, राहुरी 79, शेवगाव व श्रीगोंदा प्रत्येकी 69, पारनेर 65, नेवासा 57, भिंगार लष्करी परिसर 31, अकोले 28, कर्जत 25, इतर जिल्ह्यातील 19, लष्करी रुग्णालयातील पाच व अन्य राज्यातील दोघांचा समावेश आहे.

आज संगमनेर तालुक्यातील उच्चांकी 154 जणांचे अहवालही पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्हा शासकीय प्रयोगशाळेकडून 97 व खासगी प्रयोगशाळेकडून 57 प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील 43, ग्रामीणभागातील 108 व अन्य तालुक्यातील तिघांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात शहरातील विद्यानगर परिसरातील 30 वर्षीय महिला, साईनाथ चौकातील 57 वर्षीय महिला, ज्ञानमाता विद्यालयाजवळील 29 वर्षीय तरुण, गिरिराज विहारमधील 65 वर्षीय महिला, गोविंदनगर मधील 28 वर्षीय तरुण, इंदिरानगर मधील 39, 35, 27 व 26 वर्षीय महिलांसह सहा वर्षीय बालक, कल्पना हौसिंग सोसायटीतील 44 वर्षीय इसमासह 38 वर्षीय महिला, मालदाड रोडवरील 50, 26 व 25 वर्षीय महिलांसह 40 व 25 वर्षीय तरुण, नवीन नगर रस्त्यावरील 39 वर्षीय महिला व 22 वर्षीय तरुण,

मोमीनपूरा येथील 88 वर्षीय वयोवृद्ध इसम, चंद्रशेखर चौकातील 27 वर्षीय महिला, रंगारगल्लीतील 30 वर्षीय महिलेसह 11 व 3 वर्षीय बालिका, नवघर गल्लीतील 47 वर्षीय विद्यमान नगरसेविका, सावता माळी नगरमधील 37 वर्षीय महिला, पावबाकी रस्त्यावरील 48 वर्षीय इसम, सुतारगल्लीतील 43 व 41 वर्षीय तरुणांसह 38 वर्षीय महिला, गणेशनगर मधील 19 वर्षीय तरुण, शासकीय विश्रामगृह परिसरातील 49 वर्षीय इसमासह 20 वर्षीय महिला, बापू वसाहतीतील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 39 वर्षीय तरुण. तर ग्रामीण क्षेत्रातील घारगाव पोलीस ठाण्याचे 49 वर्षीय पोलीस निरीक्षक, वेल्हाळे येथील 40 वर्षीय तरुण, सुकेवाडीतील 58 वर्षीय इसम, पिंप्री लौकीतील 21 वर्षीय तरुण, ढोलेवाडीतील 40 वर्षीय महिला, देवकौठे येथील 48 वर्षीय महिला, जवळे बाळेश्वर येथील 34 वर्षीय तरुण,

चंदनापूरी येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 28, 26 व 25 वर्षीय तरुण, 35, 25 व 24 वर्षीय महिलांसह 9, 5 व एक वर्षांचे बालक व तीन वर्षांची बालिका, हिवरगाव पावसा येथील 50 वर्षीय इसम, सावरगाव तळ येथील 43, 41 व 29 वर्षीय तरुण, रहिमपूर येथील 40 वर्षीय महिला, जाखुरी येथील 27 वर्षीय तरुण, पानोडी येथील 55 वर्षीय इसम, जोर्वे येथील 40 वर्षीय तरुण, आश्वी बु. येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 57 वर्षीय इसम, सायखिंडीतील 38 वर्षीय तरुण, दाढ बु. येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, खांजापूर येथील 27 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, साकूर येथील 42, 17 व 15 वर्षीय तरुणांसह 18 वर्षीय तरुणी, सादतपूर येथील 75 वर्षीय महिला, दाढ खुर्द येथील 23 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 60 व 50 वर्षीय महिलांसह 57 वर्षीय इसम, 22 वर्षीय तरुण व 9 वर्षीय बालिका,

निमगाव जाळीतील 71 वर्षीय दोघांसह 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 50 व 48 वर्षीय इसम, 36, 35, 24 व 22 वर्षीय तरुण आणि 63 व 40 वर्षीय महिलेसह 17 वर्षीय तरुणी, घुलेवाडीतील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 52, 47 व 44 वर्षीय इसम, 41 वर्षीय दोघांसह 39, 38, 37, 36 वर्षीय दोघे, 35, 32, 22, 18 व 17 वर्षीय तरुण आणि 66, 43, 40, 34, 33 व 32 वर्षीय महिला, मालपाणी नगरमधील 39 वर्षीय तरुण, चिंचोली गुरव येथील 30 वर्षीय तरुण, वडगाव पान येथील 66 वर्षीय ज्येष्ठासह 48 वर्षीय इसम व 35 वर्षीय महिला, सारोळे पठार येथील 42 वर्षीय तरुण, कोकडवाडी येथील 44 वर्षीय इसम, गुंजाळवाडीतील 53 वर्षीय इसम, 17 वर्षीय तरुण, श्रीराम नगरमधील 65 वर्षीय महिला व 47 वर्षीय इसम, गोल्डन सिटीतील 45 वर्षीय इसम व रहाणे मळ्यातील 55 वर्षीय इसम,

निमोण येथील 50 वर्षीय इसमासह 35 वर्षीय तरुण, निमगाव येथील 50 वर्षीय इसम, डोळासणे येथील 57 वर्षीय इसम, कोल्हेवाडीतील 49 वर्षीय महिला, आश्वी खुर्दमधील 41 वर्षीय महिलेसह 35 वर्षीय तरुण, अरगडे मळ्यातील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मालुंजे येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निळवंडे येथील 38 व 24 वर्षीय तरुण, तळेगाव येथील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 47 वर्षीय इसम, 65 व 28 वर्षीय महिला व केवळ संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 47 वर्षीय इसमासह 36, 30 व 29 वर्षीय तरुण, 65, 55, 53 व 20 वर्षीय महिला तसेच अन्य तालुक्यातील घोसपुरी येथील 11 वर्षीय बालक, विरगाव (अकोले) येथील 43 वर्षीय तरुण व श्रीरामपूर येथील 26 वर्षीय महिला या तिघांसह एकूण 154 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने संगमनेर तालुका आता 8 हजार 788 रुग्णसंख्येवर पोहोचला असून सक्रीय रुग्णांची संख्या 537 झाली आहे.

