वटसावित्री पौर्णिमेनिमित्त 1111 वटवृक्षांचे रोपण करणार ः तांबे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत व कोरोना संकटात अत्यंत गरजेच्या ठरलेल्या प्राणवायूसाठी गुरुवारी (ता.24) वटसावित्री पौर्णिमेनिमित्त संपूर्ण संगमनेर तालुक्यात 1111 वटवृक्षांचे रोपण करण्यात येणार असल्याची माहिती दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख तथा नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी दिली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना दुर्गा तांबे म्हणाल्या, सहकारमहर्षी स्व.भाऊसाहेब थोरात यांनी पुढील पिढ्यांच्या निरोगी जीवनासाठी दंडकारण्य अभियान सुरु केले. याअंतर्गत मागील पंधरा वर्षांमध्ये बोडक्या उघड्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्यात आले आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका व परिसरात वृक्षसंवर्धन संस्कृती वाढीस लागली आहे. दंडकारण्यात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त 1111 वटवृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. प्रत्येक गावामध्ये किमान पाच वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी तेथील स्थानिक महिला पदाधिकार्‍यांवर देण्यात येणार आहे.

Visits: 74 Today: 1 Total: 1105095

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *