एक जुलैपासून दंडकारण्य अभियानास प्रारंभ ः थोरात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी सहकारमहर्षी स्व.भाऊसाहेब थोरात यांनी पुढील पिढ्यांसाठी दूरदृष्टीतून सुरू केलेले दंडकारण्य अभियान ही मोठी लोकचळवळ ठरली आहे. सध्या असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मागील महिन्यात झालेली ऑक्सिजनची कमतरता या सर्व बाबींमुळे निरोगी जीवन व प्राणवायूसाठी वृक्षरोपण, संवर्धन व पर्यावरण संवर्धन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे जयहिंद लोकचळवळ, अमृत उद्योग समूहातील सर्व संस्था, सर्व सेवाभावी संस्था, विविध शासकीय विभाग, शाळा व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोळाव्या दंडकारण्य अभियानाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मुख्य प्रवर्तक आमदार डॉ.सुधीर तांबे हे होते. तर व्यासपीठावर प्रकल्प प्रमुख दुर्गा तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, शिवाजी थोरात, सभापती सुनंदा जोर्वेकर, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, रामहरी कातोरे, उपसभापती नवनाथ अरगडे, गणपत सांगळे, ज्ञानदेव वाफारे, राजेंद्र कडलग, तुळशीराम सोनवणे, राजेंद्र गुंजाळ, मोहन करंजकर, अ‍ॅड.मधुकर गुंजाळ, अ‍ॅड.सुहास आहेर, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय वनाधिकारी विशाल बोर्‍हाडे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरोळे, वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे, कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, सामाजिक वनीकरणाचे केतन बिरासीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आर.आर.पाटील, सौरभ पाटील, राष्ट्रीय महामार्गाचे साळुंखे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, अनिल शिंदे, समन्वयक बाळासाहेब उंबरकर आदी उपस्थित होते.

Visits: 15 Today: 1 Total: 118213

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *