सर्वोदय पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी संकेत शाह
![]()
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सहकारात अग्रेसर असणार्या सर्वोदय पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी संकेत शाह यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

सहकार विभागाचे अध्यासी अधिकारी आर.एस.वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. त्यावेळी उपाध्यक्ष पदासाठी शाह यांच्या नावाची सूचना संचालक सुरेश शाह यांनी मांडली. त्यास संचालक वीरेंद्र शाह यांनी अनुमोदन दिले. त्यांची निवड जाहीर करण्यात आली. त्यानंतर अध्यासी अधिकारी वाकचौरे यांनी निवड जाहीर केली. या सभेस पतसंस्थेचे अध्यक्ष सचिन शाह, संचालक शैलेंद्र ओहरा, महेश कटारिया, सचिन बिपीनचंद्र शाह, कल्पेश मेहता, सुरेश शाह, दर्शन मेहता, सुभाष शाह, वैभव शाह, शरद ओहरा, राजेश दोशी, आशिष शाह, राजेंद्र काळे, अरुण नारायणे, नितीन भागवत, श्वेता मेहता, राखी शाह, व्यवस्थापक तथा कार्यलक्षी संचालक मधुकर वनम, सहाय्यक व्यवस्थापक राजेश ढगे आदी उपस्थित होते. शेवटी नूतन उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना संस्थेचा अधिक लौकिक वाढविण्यासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल संचालकांचे आभार मानले.
