संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या पन्नासच्या आत! जिल्ह्याच्या रुग्णसंख्येतही झाली खूप मोठी घसरण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तब्बल 75 दिवसांनंतर संगमनेरकरांना सर्वात मोठा दिलासा मिळाला असून आज तालुक्यात अवघे 48 रुग्ण आढळून आले आहेत. अर्थात आज शासकीय प्रयोगशाळेचा एकही अहवाल अप्राप्त असल्याने संगमनेरकरांना हा दिलासा मिळाला असून तो तात्पूरता ठरण्याचीही शक्यता आहे. आज खासगी प्रयोशाळेच्या 23 आणि रॅपिड अँटीजेनच्या 25 अहवालांतून शहरातील अवघ्या नऊ जणांसह तालुक्यातील 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 21 हजार 987 झाली आहे.

मागील पंधरवड्यापासून जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत एकसारखी घसरण होत असल्याचे दिलासादायक चित्र बघायला मिळत आहे. मात्र त्याचवेळी संगमनेर तालुक्यातून दररोज अपेक्षेहून अधिक रुग्ण आढळत असल्याने जिल्ह्याला दिलासा मिळत असतांना तालुक्याच्या चिंता मात्र कायम होत्या. त्यातच आजतर तालुक्याची रुग्णसंख्या 26 मार्चनंतर पहिल्यांदाच 50 पेक्षाही खाली आल्याने आजचा दिवस संगमनेरकरांसाठी मोठा दिलासा देणारा ठरला आहे. आज शासकीय प्रयोगशाळेकडून एकही पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त न झाल्याने तालुक्याची रुग्णसंख्या एकदम खाली आल्याचे बोलले जात असून आजचा दिलासा तात्पूरता ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आज समोर आलेल्या तालुक्यातील एकूण रुग्णांमध्ये शहरातील नऊ जणांचा समावेश असून त्यात मालदाड रोडवरील 32 वर्षीय तरुण, लालाजी चौकातील 50 वर्षीय इसम व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 71, 65 व 35 वर्षीय महिलांसह 36, 34 व 24 वर्षीय तरुण आणि 16 वर्षीय मुलीचा समावेश आहे. ग्रामीण भागातील 21 गावे आणि वाड्या-वस्त्यांमधून आज 39 रुग्ण समोर आले असून त्यात शेंडेवाडीतील 47 वर्षीय इसम, झोळे येथील 65 वर्षीय महिला, शेडगाव येथील 30 व 21 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 85 वर्षीय वयोवृद्ध इसमासह 55 वर्षीय इसम, 50 वर्षीय महिला व 22 वर्षीय तरुण, साकूर येथील 55, 32 व 30 वर्षीय महिलांसह 11 वर्षीय मुलगी व सात आणि पाच वर्षांची बालके, कालेवाडीतील 27 वर्षीय महिला, वडगाव पान येथील 40 वर्षीय तरुण,

समनापूर येथील 30 वर्षीय तरुण, 30 वर्षीय महिला व दोन वर्षीय बालक, सावरगाव तळ येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40 वर्षीय तरुण, 50, 33 व 32 वर्षीय महिला व 18 वर्षीय तरुणी, गुंजाळवाडीतील 33 वर्षीय तरुण व 32 वर्षीय महिला, निमज येथील 58 वर्षीय इसम व 30 वर्षीय तरुण, कनोलीतील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, खराडी येथील 44 वर्षीय महिला, लोहारे येथील 58 वर्षीय इसम, चिखली येथील 68 वर्षीय महिला, पळसखेडे येथील 32 वर्षीय तरुण, सोनोशी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, तळेगाव दिघे येथील 21 वर्षीय तरुणी, मेंढवण येथील 55 वर्षीय महिला, औरंगपूर येथील 55 वर्षीय महिला व कोकणगाव येथील 27 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

आज जिल्ह्याच्या रुग्णसंख्येतही मोठी घट नोंदविण्यात आली आहे. आज शासकीय प्रयोगशाळेचे अवघे 21, खासगी प्रयोगशाळेचे 407 व रॅपिड चाचणीतून समोर आलेल्या 343 अहवालांतून जिल्ह्यातील 771 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात सर्वाधिक श्रीगोंदा 80, पारनेर 74, पाथर्डी 70, शेवगाव 63, श्रीरामपूर 62, कर्जत व राहुरी प्रत्येकी 54, नेवासा व संगमनेर प्रत्येकी 48, कोपरगाव 46, अहमदनगर महापालिका क्षेत्र 44, अकोले 39, राहाता 35, नगर ग्रामीण 26, जामखेड 20, इतर जिल्ह्यातील आठ रुग्णांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 66 हजार 242 झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *