श्रीरामपूरमध्ये दुचाकीवरून पडून तरुणाचा मृत्यू

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ अज्ञात वाहनाने हूल दिल्यामुळे दुचाकीवरून पडून एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.21) घडली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील राऊत व कांदळकर परिवाराचा विवाह परिसरातील कार्यालयात संपन्न होत असताना विवाहनिमित्त निकटवर्तीय नातेवाईक अमोल हरीभाऊ राऊत (वय 23) व तरुण कांदळकर (वय 18) दोघे सामानाची ने-आण करण्यासाठी धावपळ करत होते. त्यासाठी ते दुचाकीवरून नेवासा रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलावरून जात होते. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना हुल दिली. त्यामुळे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. यात दोघांनाही जबर मार लागला. यातील अमोल राऊत हा जागेवरच गतप्राण झाला तर कांदळकर यास जबर मार लागला. बराच वेळ रस्त्यावर दोघेही तरुण पडून राहिल्याने त्यांना लवकर उपचार मिळाले नाहीत. घटना समजल्यानंतर नातेवाईकांच्या सामोपचाराने साध्या पद्धतीने लग्न सोहळा उरकण्यात आला. सध्या जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Visits: 120 Today: 2 Total: 1110155

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *