महसूल मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली 63 गावे कोरोना मुक्त प्रभावी ‘संगमनेर पॅटर्न’ ठरतोय राज्यासाठी दिशादर्शक
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोनाच्या दुसर्या लाटेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमधील प्रशासन व गावागावातील स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून तालुक्यात नागरिकांच्या सर्वाधिक कोरोना तपासण्या झाल्या आहेत. याचा परिणाम आजमितीला 63 गावे कोरोना मुक्त झाली असून, 29 गावे कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहेत.
देवकौठे ते बोटा असे 100 किलोमीटरच्या विस्तीर्ण असलेल्या संगमनेर तालुक्यात 171 गावे व 263 वाड्या-वस्त्या आहेत. पुणे, नाशिक या शहरांशी जवळीक व जादा दळणवळण यांसह संगमनेरमध्ये असलेली चांगली वैद्यकीय सुविधा यासाठी फायदेशीर ठरली आहे. त्यातच कोपरगाव, राहाता, जुन्नर, पारनेर, अकोले, सिन्नर या तालुक्यांमधून अनेक नागरिक कोरोना उपचारांसाठी संगमनेरात येत असत. मात्र, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्य पातळीवर महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असताना सुद्धा अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या थांबविण्यासाठी सातत्याने प्रशासनाला सूचना देत होते. यानुसार तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक कोरोना तपासण्या झाल्या.
याबरोबरच घरोघर नागरिकांची तपासणी करण्यात आली. गावागावांत ग्राम आरोग्य रक्षक दलातील युवकांनी कार्यक्षमपणे काम करून काही लक्षणे आढळल्यास तातडीने विलगीकरण केले. विविध ठिकाणी कोविड केअर सेंटर उभे करून नागरिकांना अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या. या संगमनेर पॅटर्नमुळे कोरोना लढ्याचे आदर्शवत मॉडेल तयार झाले. ग्रामीण रुग्णालय व कॉटेज रुग्णालयाकरीता चार रुग्णवाहिका, पाच बायपॅप मशीन, तालुकास्तरावरील पहिले आरटीपीसीआर मशीन, दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यांसह अनेक आधुनिक सुविधा वाढविण्यात आल्या. याचबरोबर नागरिकांच्या लसीकरणासाठीही विशेष मोहीम राबवली गेली. या विविध उपाययोजनांमुळे आजमितीला तालुक्यातील 63 गावे कोरोनामुक्त झाली असून 29 गावे कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहेत.
कोरोना मुक्त गावांमध्ये आभाळवाडी, आंबी दुमाला, आंबीखालसा, आश्वी खु., आरामपूर, औरंगपूर, आजमपूर, बाळापूर, बांबळेवाडी, भोजदरी, बिरेवाडी, बोरबन, चणेगाव, चिकणी, चिंचपूर बु., चिंचपूर खुर्द, दाढ, दरेवाडी, देवकौठे, ढोलेवाडी, धुपे, डोळासणे, आनंदवाडी, हसनाबाद, हिवरगाव पठार, जांबुत खुर्द, जुनेगाव, काकडवाडी, कनकापूर, कणसेवाडी, करुले, कवटेवाडी, कौठे मलकापूर, काळेवाडी, खांडगेदरा, खरशिंदे, कोकणेवाडी, कोंची, कुंभारवाडी, कुरण, कुरकुंडी, कुरकुटवाडी, महालवाडी, मालेगाव पठार, मांची, मेंगाळवाडी, म्हसवंडी, नांदुरी दुमाला, निमगाव खुर्द, निमगाव टेंभी, ओझर बु., पारेगाव बु., पेमरेवाडी, प्रतापपूर, रायते, सारोळे पठार, सावरगाव घुले, शेळकेवाडी, शेंडेवाडी, शिंदोडी, शिरसगाव, विद्यानगर, वनकुटे, वडझरी खु. या गावांचा समावेश आहे. तर 29 गावांमध्ये एक कोरोना रुग्ण उपचार घेत असून ते देखील लवकरच कोरोना मुक्त होणार आहेत. यामुळे एकाच दिवसात संगमनेर तालुक्याची कोरोना मुक्त संख्याही शंभरच्या जवळ जाणार आहे.
याकामी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात यांच्या नेतृत्वाखाली व प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप, डॉ.संदीप कचेरिया, डॉ.राजकुमार जर्हाड, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, मुकुंद देशमुख, सुनील पाटील, सुधाकर मांडवकर यांसह प्रशासनातील विविध अधिकार्यांसह कर्मचारी, शिक्षक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका व पदाधिकार्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने अहोरात्र काम केले. यामुळे सद्यस्थितीत ‘संगमनेर पॅटर्न’ राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहे.