तळेगाव दिघे व संगमनेरात रक्तदान शिबिराचे आयोजन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडच्या संकटात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्याने संगमनेरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण समितीच्यावतीने रक्तदान सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 28 मे ते 5 जून असा सप्ताहाचा कालावधी असून, स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या जयंतीचे (ता.28 मे) औचित्य साधून करण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जनजाती कल्याण आश्रम, अधिवक्ता परिषद, मजदूर संघ, सहकारी भारती यांच्या सहकार्याने तळेगाव दिघे येथे शुक्रवारी (ता.4) सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत श्रीराम मंदिर येथे होणार आहे. तरी या शिबिरात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दत्तात्रय दिघे, शुभम दिघे, सचिन कदम, सौरभ म्हाळस, किरण थोरात यांनी केले आहे. तर शनिवारी (ता.5) संगमनेर शहरातील भंडारी मंगल कार्यालय आणि मालपाणी लॉन्स येथे माहेश्वरी पंच ट्रस्ट व मालपाणी उद्योग समूहाच्या सहकार्यातून सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात शहरासह परिसरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून रक्तदान करावे, असे आवाहन ज्ञानेश्वर थोरात, विवेक कोथमिरे, किरण पल्लेरा यांसह आयोजकांनी केले आहे.