रुग्णसंख्येत घट होवूनही तालुक्याची सरासरी मात्र उंचावलेलीच! पठारभागात आजही निम्मे रुग्ण; तालुक्याची एकूण रुग्णसंख्याही शंभराहून अधिक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संक्रमणात आघाडीवर असलेल्या जिल्ह्यातील चार तालुक्यांना आज तात्पूरता दिलासा मिळाला असून रविवारच्या तुलनेत रुग्णसंख्या कमालीची खालीवली आहे. तर दुसरीकडे पारनेर व पाथर्डी तालुक्यातील रुग्णसंख्या दुपटीने वाढली असून जिल्ह्यातील कोविडचे संक्रमण अजूनही भरात असल्याचे सिद्ध झाले आहे. आज जिल्ह्यात केवळ पारनेर व संगमनेर तालुक्यातून तीन आकडी रुग्ण समोर आले आहेत. त्यात संगमनेरातील 103 रुग्णांचा समावेश आहे. तालुक्याच्या पठारभागातील संक्रमणाची गती आजही टिकून असून तेथून 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 26 हजार 479 झाली आहे.

राज्यातील कोविड संक्रमणात घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनापासून राज्यातील बहुतेक सर्वच जिल्ह्यातील निर्बंध मोठ्या प्रमाणात मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे रविवारपासूनच बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसू लागली असून कोविड नियमांकडे होणारे दुर्लक्ष संक्रमण वाढीला कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्याच्या पठारभागात दहा दिवसांचा लॉकडाउन संपून आठवडा उलटला असला तरीही तेथील संक्रमण अजूनही कायम असल्याने पठारभागातील विविध वाड्या-वस्त्या व गावांमधून दररोज रुग्ण समोर येण्याची श्रृंखला कायम आहे. त्यामुळे यावेळच्या संक्रमणवाढीला प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत ठरत असल्याचे दिसू लागले आहे.

आज खासगी प्रयोगशाळेचे 96 आणि रॅपिड अँटीजेनच्या सात अहवालांतून संगमनेर तालुक्यातील 103 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील इंदिरानगर येथील 54 वर्षीय इसम व संगमनेर असा पत्ता असलेल्या 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तालुक्याच्या पठारभागातून आज 48 रुग्ण समोर आले असून त्यात बोटा येथील 42, 36 व 32 वर्षीय महिला, 33 व 32 वर्षीय दोघे तरुण व 22 वर्षीय तरुणी, मांडवे बु. येथील 88, 65 व 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 42, 40, 38, 29 व 26 वर्षीय तरुण, 37 व 31 वर्षीय महिला व 16 वर्षीय मुलगा, देसवडे येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 29 वर्षीय तरुण,

साकूर येथील 55 वर्षीय इसमासह 50 वर्षीय महिला, 38, 33 व 27 वर्षीय तरुण, सावरगाव घुले येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 24 वर्षीय महिला, बिरेवाडीतील 29 वर्षीय तरुणासह 16 वर्षीय मुलगा, कुंभारवाडीतील 55 वर्षीय महिला, जांभुळवाडीतील 60 वर्षीय महिला, आंबी खालसा येथील 54 वर्षीय इसम, शिंदोडी येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50 वर्षीय महिला, रणखांब येथील 28 वर्षीय तरुण, शेंडेवाडीतील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, जांबुत खुर्द येथील 36 वर्षीय तरुण, पिंपळगाव देपा येथील दोन वर्षीय बालिका, कौठे मलकापूर येथील 19 वर्षीय तरुण,

अकलापूर येथील 46 वर्षीय इसम, हिरेवाडीतील 56 वर्षीय इसमासह 28 वर्षीय महिला, नांदूर येथील 50 वर्षीय इसम, मांडवे खुर्द येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 52 वर्षीय इसम व 35 वर्षीय महिला, दरेवाडीतील 50 वर्षीय महिला, येलखोपवाडीतील 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, तिगाव येथील 52 वर्षीय इसम, वेल्हाळे येथील 39 वर्षीय महिलेसह 24 वर्षीय तरुण, सावरगाव तळ येथील 13 वर्षीय मुलगा, जवळे कडलग येथील 75 वर्षीय महिला, निमगाव जाळीतील 39 वर्षीय तरुणासह 14 वर्षीय दोघी व आठ वर्षीय मुली, सायखिंडीतील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निळवंडे येथील 60 वर्षीय महिलेसह 38 वर्षीय तरुण, वडगाव पान येथील 40 व 27 वर्षीय तरुण, कनोली येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 58 वर्षीय महिला,


पोखरी हवेली येथील 79 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 68 व 37 वर्षीय महिला व 32 वर्षीय तरुण, धांदरफळ येथील 65 व 50 वर्षीय महिलांसह 39 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 65 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कोल्हेवाडी येथील 60 व 55 वर्षीय महिलांसह 40 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 65 वर्षीय महिलेसह 40 वर्षीय तरुण व 15 वर्षीय मुलगा, चिंचोली गुरव येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 42 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40 व 20 वर्षीय तरुण व 16 वर्षीय मुलगी, पारेगाव बु. येथील 75 वर्षीय महिलेसह 45 वर्षीय इसम व 22 वर्षीय तरुणी, कणकापूर येथील 50 वर्षीय इसम,

तळेगाव दिघे येथील 33 व 18 वर्षीय तरुण, पावबाकी येथील 45 वर्षीय महिला, हंगेवाडीतील 30 वर्षीय तरुण, ओझर बु. येथील 30 वर्षीय महिला, आश्वी बु. येथील 42 व 25 वर्षीय महिलांसह 28 वर्षीय तरुण व कर्‍हे येथील 26 वर्षीय तरुण. तसेच अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील 40 वर्षीय महिला अशा एकूण 103 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संगमनेर तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 26 हजार 479 झाली आहे.


जिल्ह्यात आज 757 रुग्ण!
जवळपास पाच दिवसांनंतर आज जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत घसरण झाली आहे. आज शासकीय प्रयोगशाळेचे 260, खासगी प्रयोगशाळेचे 352 व रॅनिड अँटीजेनच्या निष्कर्षातून 145 जणांचे अहवाल समोर आले त्यातून जिल्ह्यातील 757 जणांना कोविडची लागण झाल्याचे आढळले. त्यात सर्वाधिक पारनेर 106, संगमनेर 103, पाथर्डी 74, श्रीगोंदा 73, नगर ग्रामीण 58, राहुरी 51, जामखेड 46, शेवगाव 45, कर्जत 39, अकोले, अहमदनगर महापालिका क्षेत्र व नेवासा प्रत्येकी 36, श्रीरामपूर 15, इमर जिल्ह्यातील 12, राहाता 10, भिंगार लष्करी परिसर व कोपरगाव प्रत्येकी सात व लष्करी रुग्णालयातील तिघा रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 3 लाख 12 हजार 589 झाली आहे.

Visits: 204 Today: 3 Total: 1105151

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *