दिलासादायक! सलग तिसर्या दिवशी संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या ‘निचांकी’! जिल्ह्याच्या सरासरी रुग्णसंख्येला लागलेली आहोटी आजही कायम असल्याने चिंतेचे मळभ हटले..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या रुग्णसंख्येला लागलेली आहोटी कायम असल्याचे समाधानकारक चित्र निर्माण झालेले असतांना आता संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्याही गेल्या तीन दिवसांपासून खाली येत आहे. त्यामुळे मागील मोठ्या कालावधीत रुग्णसंख्येचे एकामागून एक धक्के सोसणार्या संगमनेरकरांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. आजही तालुक्यातील अवघ्या 117 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात संगमनेर शहरातील केवळ 23 जणांसह अन्य तालुक्यातील नऊ रुग्णांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 21 हजार 595 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत मोठी घट नोंदविली गेली असून आज सलग आठव्या दिवशी रुग्णसंख्या दोन हजाराहून कमी आहे. मात्र त्याचवेळी संगमनेर तालुक्यातील रुग्णगतीत सातत्य कायम राहील्याने काहीशा चिंता निर्माण झाल्या होत्या. मात्र जिल्ह्यासोबतच आता गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यातील रुग्णसंख्याही उताराला लागल्याचे समाधानकारक चित्र दिसू लागले आहे. शुक्रवारच्या तुलनेत जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी व जामखेड या तालुक्यांमधील रुग्णांमध्ये काहीशी वाढ झाल्याने काल शंभराहून खाली आलेल्या या तालुक्यातील रुग्णसंख्या आज पुन्हा शंभरी ओलांडून पुढे गेली आहे. मात्र जिल्ह्याच्या एकूण सरासरीत त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.
आज शासकीय प्रयोगशाळेच्या 14, खासगी प्रयोगशाळेच्या 40 आणि रॅपीड अँटीजेनच्या 117 निष्कर्षातून संगमनेर शहरातील 23 जणांसह अन्य तालुक्यातील नऊ आणि तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील 85 अशा एकूण 117 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात शहरातील रहेमतनगर परिसरातील 58 वर्षीय इसम, मालदाड रस्त्यावरील 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 वर्षीय महिला आणि 28 वर्षीय तरुण, सावरकर मार्गावरील आठ वर्षीय मुलगा, जून्या पोस्टाजवळील 16 वर्षीय तरुणासह 15 वर्षीय मुलगी, कोल्हेवाडी रस्त्यावरील 29 वर्षीय तरुण, परदेशपूर्यातील 58 वर्षीय महिलेसह चार व दोन वर्षांची बालके, गणेशनगर मधील 38 वर्षीय महिलेसह चार वर्षीय बालिका आणि केवळ संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 42, 35 व 26 वर्षीय तरुण, 54, 41, 38, 37, 24 व 20 वर्षीय महिला,
तसेच अन्य तालुक्यातील अहमदनगर येथील 24 वर्षीय तरुण, श्रीरामपूर येथील 19 वर्षीय तरुणी व अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील 63 वर्षीय महिला आणि वाशेरे येथील 54 व 27 वर्षीय महिलेसह 33, 30 व 21 वर्षीय तरुण आणि चार वर्षीय बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यासोबत ग्रामीणभागातील पिंपळगाव माथा येथील 21 वर्षीय तरुण, सादतपूर येथील 70 वर्षीय महिलसेह 40 व 38 वर्षीय तरुण, मेंढवण येथील 43 वर्षीय तरुण व 23 वर्षीय महिला, लोहारे येथील 40 वर्षीय तरुण, कासारे येथील 24 वर्षीय तरुण, ओझर खुर्द येथील 42 वर्षीय तरुणासह 35 वर्षीय महिला, निमगाव येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमगाव जाळीतील 54 वर्षीय इसमासह 36 व 30 वर्षीय तरुण आणि 31 व 20 वर्षीय महिला,
कोकणगाव येथील 42, 25 व 17 वर्षीय तरुण, आश्वी बु. येथील 75 वर्षीय महिलेसह 45 वर्षीय इसम, रहिमपूर येथील 36 व 22 वर्षीय तरुण, खरशिंदे येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, साकूर येथील 50 वर्षीय महिलेसह 35 वर्षीय तरुण आणि पाच वर्षीय मुलगा, घुलेवाडीतील 47 वर्षीय इसमासह 43 वर्षीय तरुण, 41 व 28 वर्षीय महिला आणि 14 वर्षीय मुलगा, झरेकाठी येथील 40 वर्षीय महिला, शेडगाव येथील सात वर्षीय बालिका, घारगाव येथील 22 वर्षीय महिला, वरुडी पठार येथील एक वर्षीय बालक, सावरगाव तळ येथील 45 वर्षीय महिलेसह 40 वर्षीय तरुण व 14 वर्षीय मुलगी, शिरापूर येथील 45 वर्षीय महिला आणि 33 वर्षीय तरुण, मालदाड येथील 38 वर्षीय महिला,
नान्नज दुमाला येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 17 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 27 व 22 वर्षीय तरुण, वडगाव पान येथील 44 वर्षीय महिला आणि 31 वर्षीय तरुण, पिंपरणे येथील 38 वर्षीय तरुण, निमज येथील 38 वर्षीय महिला, कर्हे व कर्हेवाडीतील 56 वर्षीय दोन व 49 वर्षीय महिला आणि 28 व 19 वर्षीय तरुण, मालुंजे येथील 40 वर्षीय महिलेसह 20 वर्षीय तरुणी, निमोण येथील 24 वर्षीय महिला, पानोडीतील 25 वर्षीय महिला, गोल्डन सिटीतील 44 वर्षीय महिला, जोर्वे येथील 59 वर्षीय इसम, कोल्हेवाडी येथील 55 वर्षीय महिलेसह 17 वर्षीय तरुणी, रामपूरवाडीतील 17 वर्षीय तरुण, खांडगाव येथील 24 वर्षीय महिला,
गुंजाळवाडीतील 26 वर्षीय तरुण, हंगेवाडीतील 47 वर्षीय इसम, सुकेवाडीतील 62 वर्षीय महिला, पळसखेडे येथील 54 वर्षीय इसम, धांदरफळ येथील 53 वर्षीय महिला, राजापूर येथील 30 वर्षीय तरुण, वाघापूर येथील 45 वर्षीय महिला, कनोलीतील 38 वर्षीय महिला, वडझरीतील 56 वर्षीय इसमासह 45 वर्षीय महिला आणि 24 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 24 वर्षीय तरुण, समनापूर येथील 46 वर्षीय महिला, सांगवी येथील 51 वर्षीय इसम, चंदनापूरीतील 55 वर्षीय इसम, सोनेवाडीतील 40 वर्षीय तरुण व खांजापूर येथील 40 वर्षीय तरुण असे तालुक्याच्या ग्रामीण भागातील 85 जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे. आजच्या रुग्णसंख्येने संगमनेर तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 21 हजार 595 झाली आहे.
जिल्ह्यातही आज सलग आठव्या दिवशी रुग्णसंख्या दोन हजारांच्या खाली राहीली. मागील 24 तासांत जिल्ह्यातील 26 जणांचा कोविडने बळी घेतला. आज जिल्ह्याच्या विविध कोविड आरोग्य केंद्रांमधून एकूण 1 हजार 796 रुग्णांना उपचारांती घरी सोडले गेले. त्यामुळे उपचार पूर्ण करुन घर गाठणार्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता 2 लाख 45 हजार 42 झाली असून जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा सरासरी वेगही आता 94.33 टक्के झाला आहे. आजच्या स्थिती जिल्ह्यात 11 हजार 629 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आजच्या अहवालातून जिल्ह्यातील सर्वाधीक 182 रुग्ण शेवगाव तालुक्यात आढळले, त्या खालोखाल श्रीरामपूर 170, पारनेर 142, नगर ग्रामीण 134, अकोले 126, संगमनेर 117, राहुरी 110, जामखेड 109, श्रीगोंदा 99, पाथर्डी 79, अहमदनगर महापालिका क्षेत्र 69, कोपरगाव व राहाता प्रत्येकी 67, कर्जत 49, नेवासा 43, इतर जिल्ह्यातील 14, भिंगार लष्करी परिसरातील आठ व लष्करी रुग्णालयातील तिघांसह 1 हजार 588 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळेे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 59 हजार 783 झाली आहे.