ग्रामीणभागातील रुग्णगती काहीशी मंदावली..! शहराला दिलासा मिळण्याचे सत्र मात्र कायम असल्याने समाधानाचे वातावरण..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पंधरवड्यानंतर संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत मंगळवारी मोठी भर पडली. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीणभागातील चिंता काहीशी वाढल्याचे दिसत असतांना आज पुन्हा एकदा विस्कळीत झालेल्या रुग्णसंख्येची गाडी रुळावर आल्याचे पहायला मिळाले. आजही खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीच्या निष्कर्षातून एकूण 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. मंगळवारच्या तुलनेत आजच्या रुग्णगतीत घट झाल्याने काहीशा समाधानासह तालुक्याची बाधित संख्या आता 4 हजार 184 वर पोहोचली आहे. आजच्या एकूण रुग्णांमध्ये शहरी भागातील अवघ्या तिघांचा समावेश आहे.
गेल्या महिन्याभरात तालुक्याच्या रुग्णसंख्येत दररोज 51 रुग्ण या गतीने तब्बल 1 हजार 521 रुग्णांची भर पडली होती. सप्टेंबरमध्ये दिड हजारांहून अधिक रुग्णांची भर घालणार्या कोविडचा वेग ऑक्टोबरच्या पहिल्याच तारखेला घटला. त्यानंतर अपवाद वगळता तालुक्यात वाढणारी रुग्णसंख्या 50 पेक्षा कमी राहील्याने आज अखेर तालुक्यातील रुग्णगती सरासरी 33.82 टक्के दररोज या प्रमाणात आली. गेल्या महिन्याच्या तुलनेत जवळपास दररोज सापडणार्या रुग्णांमध्ये तब्बल 20 जणांची घट झाल्याने हा महिना संगमनेरकरांसाठी दिलासा देणाराच ठरला आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेकडून अवघा एक, खासगी प्रयोगशाळेकडून दहा तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून सोळा जणांचे अहवालही पॉझिटिव मिळाले आहेत. त्यात शहरातील तिघे तर ग्रामीण भागातील 24 जणांचा समावेश आहे. यात शहरातील गणेश नगर परिसरातील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कोल्हेवाडी रस्त्यावरील 55 वर्षीय महिला व घुलेवाडी शिवारातील साईश्रद्धा चौकात राहणाऱ्या 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. शहरातील रुग्ण वाढीला लागलेली ओहोटी आजही कायम असल्याने शहरात समाधानाचे वातावरण आहे.
आज तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेडगाव येथील 38 वर्षीय तरुण, झोळे येथील 24 वर्षीय तरुणासह 24 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, खांडगाव येथील 33 व 17 वर्षीय तरुण, ओझर खुर्द येथील 37 वर्षीय तरुण, आश्वी बुद्रुक येथील 43, 25, 23 व 22 वर्षीय तरुणांसह 18 वर्षीय तरुणी, समनापुर येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, जोर्वे येथील 85 वर्षीय वयोवृद्धासह 36 वर्षीय तरुण, हंगेवाडी येथील 70 वर्षीय महिलेसह 19 वर्षीय तरुण,
घुलेवाडी येथील 39, 36 व 35 वर्षीय तरुण, पिंपरने येथील 39 वर्षीय तरुण, वाघापूर येथील 44 वर्षीय तरुण, चिकणी येथील 28 वर्षीय तरुण व सोनोशी येथील 27 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव प्राप्त झाला आहे. गेल्या एक ऑक्टोबरपासून शहरी संक्रमणाला लागलेला ब्रेक आजही कायम असल्याने दररोज तुरळक रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे शहरात काहीसे दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. तर ग्रामीण भागातील रुग्ण संख्येतील चढ-उतार कायम असून, आजही 24 रुग्णांची भर पडल्याने ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढतच आहे. आज एकूण रुग्ण संख्येत 27 जणांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या 4 हजार 184 वर पोहोचली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आज ३४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार २४१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ९५.७९ टक्के झाले आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येत २८५ बाधितांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार ४९१ झाली आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २३, जामखेड ०२, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०३, पारनेर ०२, पाथर्डी ०२, राहाता ०१, राहुरी ०५, संगमनेर ०१, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०२, लष्करी परिसर ०१, लष्करी रुग्णालय ०१, आणि अन्य जिल्ह्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.
खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील १९,अकोले ०२, जामखेड ०१, कर्जत ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०१, पारनेर ०४, पाथर्डी ०४, राहाता १०, राहुरी ०९, संगमनेर ०७, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर ०९ व लष्करी परिसरातील दोघांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत.
रॅपिड अँटीजेन चाचणीतूनही अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २२, अकोले १४, जामखेड ०५, कर्जत १४, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०१, पारनेर ०८, पाथर्डी ३०, राहाता १२, राहुरी ०३, संगमनेर १६, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर ०२ आणि लष्करी परिसरातील एकाला कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे.
आज जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर मधून ३४६ रुग्णांना उपचार पूर्ण केल्याने घरी सोडण्यात आले. त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ८५, अकोले ३४, जामखेड ०५, कर्जत ०८, कोपरगाव ०४, नगर ग्रा ३०, नेवासा ०४, पारनेर १९, पाथर्डी ४८, राहाता १५, राहुरी १०, संगमनेर ३२, शेवगाव १७, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर १२, लष्करी परिसर ०३, लष्करी रुग्णालय ०३ आणि इतर जिल्ह्यातील एका रुग्णांचा समावेश आहे.
- जिल्ह्यातील बरे झालेली रुग्णसंख्या : ५३ हजार २९१..
- जिल्ह्यात उपचार सुरू असलेले एकूण रुग्ण : १ हजार ४९१..
- जिल्ह्यातील आजवरचे एकूण मृत्यू : ८५३..
- जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या : ५५ हजार ६३५..
- जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ९५.७९ टक्के..
- आज जिल्ह्यातील ३४६ रुग्णांना डिस्चार्ज तर २८५ बाधितांची नव्याने पडली भर..