डाऊच बुद्रूक शिवारात पुरुषाचा मृतदेह आढळला

डाऊच बुद्रूक शिवारात पुरुषाचा मृतदेह आढळला
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील डाऊच बुद्रूक शिवारात अंदाजे तीस ते पस्तीस वयाच्या अज्ञात पुरुष जातीचा शुक्रवारी (ता.4) सकाळी सातच्या सुमारास मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.


शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास डाऊच बुद्रूक येथील गोदावरी नदीच्या पाण्यात अंदाजे तीस ते पस्तीसवर्षीय वयाचा अज्ञात पुरुष जातीचा मृतदेह सापडला. याबाबतची माहिती शहर पोलीस ठाण्याला मिळताच सहाय्यक फौजदार शैलेंद्र ससाणे यांनी घटनास्थळी जावून भेट दिली. त्यानंतर पोलीस पाटील अण्णासाहेब कांबळे यांनी शहर पोलिसांत खबर दिली. दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Visits: 161 Today: 1 Total: 2121183

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *