बापरे! संगमनेर तालुक्याच्या रूग्णसंख्येत पडली विक्रमी भर! एकाच दिवशी 80 बाधित आढळल्याने तालुक्याचा प्रवास दुसऱ्या सहस्रकाकडे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवसोंदिवस संगमनेर तालुक्यातील कोविडस्थिती भयंकर होत चालली असून रुग्णसंख्येत दररोज भर पडत असल्याने संगमनेर तालुका आता दुसर्या सहस्रकाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. त्यातच आज तालुक्याच्या कोविड इतिहासात दुसऱ्यांदा सर्वाधिक रुग्ण संख्येचा विक्रम नोंदविला गेला आहे. तालुक्याच्या रूग्ण संख्येत आज थोडी ना थिडकी तब्बल 80 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याने एकाच दिवसात रुग्ण संख्येचा डोंगर गाठताना 1 हजार 895 रुग्णसंख्या सर केली आहे.
गुरुवारी रात्री उशीराने खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून शहरातील शिवाजीनगर परिसरातील पाच संशयित बाधित झाल्याचे समोर आले होते. त्यात 78, 48, 32 व 31 वर्षीय महिलांसह एक वर्षीय बालिका, रंगारगल्लीतील 90 वर्षीय वयोवृद्ध महिला, गिरिराजनगर मधील 59 वर्षीय इसम अशा शहरातील एकुण सात जणांचा समावेश होता.
या चाचणीतून तालुक्यातील नऊ जणांचे अहवालही पॉझिटिव्ह आले होते. त्यातून संगमनेर खुर्द मधील 38 व 16 वर्षीय महिलांसह सात वर्षीय बालक, वाघापूर येथील 45 वर्षीय तरुण, रहिमपुर येथील 57 वर्षीय महिला, साकुर मधील 75 वर्षीय इसमासह 69 वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द मधील 70 वर्षीय महिला व मंगळापूर येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक संक्रमित झाल्याचे समोर आले. त्यामुळे गुरुवारीच तालुक्याच्या बाधितसंख्येने अठरावे शतक ओलांडून 1 हजार 815 रुग्णसंख्या गाठली होती.
गुरुवारी समोर आलेल्या अहवालातील रुग्णसंख्या दररोज सापडणार्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी असल्याने संगमनेरकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर काही वेळातच मालदाड मधील 35 वर्षीय तरुण छायाचित्रकाराच्या मृत्युची वार्ता आल्याने अवघा तालुका हळहळला. सदर तरुणाचे संपूर्ण कुटुंब गेल्या 20 ऑगस्टरोजी संक्रमित झाले होते. त्यातील सर्व रुग्ण बरे झाले, मात्र सदर तरुणाची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला संगमनेरच्या खासगी रुग्णालयातून नाशिकला हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरु असतांना बुधवार 2 सप्टेंबररोजी त्याच्या 80 वर्षीय आजोबांचे हृदयविकाराने निधन झाले, तर त्याच्या दुसर्याच दिवशी काल गुरुवारी रात्री कोविडने त्या तरुणाचा बळी घेतल्याने संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त झाली.
संगमनेर तालुक्यात आज कोविडचा अक्षरश: उद्रेक झाला असून शासकीय व खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहरातील अठरा जणांसह 80 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर शहरातील माळीवाडा परिसरात राहणाऱ्या 45 व 18 वर्षीय महिलांसह 21 वर्षीय व 18 वर्षीय तरुण, जनतानगर परिसरातील 41 वर्षीय तरुण, वाडेकर गल्ली परिसरातील 27 वर्षीय तरुण, गणेशनगर भागातील 75 व 60 वर्षीय महिला, साई श्रद्धा चौकातील 60 वर्षीय पुरूषासह चौरेचाळीस व 42 वर्षीय तरुण, बाजारपेठ परिसरातील 31 वर्षीय तरुण, शिवाजीनगर मधील 36 वर्षीय तरुण, मालदाड रोड परिसरातील 32 वर्षीय महिला, 24 वर्षीय तरुणांसह नऊ वर्षीय बालिका, तसेच 58 वर्षीय महिला, 36 वर्षीय तरुण.
तर तालुक्यातील घुलेवाडी येथील 50 व 47 वर्षीय इसम व 43 वर्षीय महिला, तसेच दहा वर्षीय बालिका, कौठे धांदरफळ येथील 50 वर्षीय महिला व 50 वर्षीय इसम, रायते येथील 68, 45, 38, 35, 21 व सतरा वर्षीय महिलांसह 40 वर्षीय तरुण व सहा वर्षीय बालिका, चिखली येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कनोली येथील 42 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 57 वर्षीय इसमासह 24 वर्षीय महिला, वाघापूर येथील 59 वर्षीय इसमासह 27 वर्षीय तरुण, 20 वर्षीय तरुणी व 10 वर्षीय बालक, चंदनापुरी येथील 39 व 25 वर्षीय तरुण, समनापुर येथील 39 वर्षीय तरुण, मंगळापुर येथील 38 वर्षीय महिलेसह 16 व 14 वर्षीय मुले, आंबी दुमाला येथील 50 वर्षीय इसम,
निमोण मधील 90 वर्षीय वयोवृद्धासह तीस वर्षीय महिला, ढोलेवाडी येथील 38 वर्षीय तरुण, चिकणी मधील 58 वर्षीय इसमासह 26 वर्षीय महिला, बोरबन मधील नऊ वर्षीय बालक, कुरकुटवाडीतील 55, 48 व 43 वर्षीय महिला तसेच 45, 28 व 26 वर्षीय तरुण, माळवाडीतील 74, 48 व पंचवीस वर्षीय महिलांसह 52, 48, 28, 18 वर्षीय पुरुष, एक वर्षीय बालक तसेच तीन वर्षीय बालिका, कोठे बुद्रुक येथील 80 वर्षीय वयोवृद्ध महिलेसह 35 व 17 वर्षीय महिला व 40 वर्षीय तरुण, माळेगाव पठारावरील 60 व 21 वर्षीय महिला, मनोली येथील एकूण 70 वर्षीय पुरुष, 64 वर्षीय महिला तसेच 35 वर्षीय तरूण व 13 वर्षीय बालक, तसेच कोल्हेवाडीतील 41 वर्षीय व 37 वर्षीय तरुणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्याच्या रुग्णसंख्येत आज एकाच वेळी 80 रुग्णांची विक्रमी वाढ झाल्याने तालुक्याची रुग्णसंख्या एकोणाविसाव्या शतकाच्या दारात 1 हजार 895 वर पोहोचली आहे.