हंगेवाडी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील हंगेवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक धराडे वादात सापडले होते. नळाला प्यायचे पाणी येत नसल्याची तक्रार घेऊन महिला गेल्या असता ग्रामसेवकांनी ग्रामस्थांना गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्यावर ग्रामस्थांनी हंगेवाडी सरपंचांना ग्रामस्थांशी असभ्य भाषेत बोलणार्‍या ग्रामसेवकाची लेखी स्वरूपात तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्धीसाठी माहिती दिली होती. त्यानंतर संबंधित ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हंगेवाडीचे ग्रामस्थ अमोल शेळके यांनी दिलेल्या अर्जाचे काम कुठपर्यंत आले या चौकशीसाठी गेले असता. हंगेवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक दराडे यांनी अमोल शेळके यांना विचारणा केली की, आपण माझ्या विरोधात प्रसारमाध्यमांना बातमी का दिली. त्यावर अमोल शेळके यांनी ग्रामसेवक यांना सांगितले की मी एकट्याने बातमी दिली नसून गावातील ग्रामस्थांच्याही त्याच्यावर सह्या आहेत. हे बोलताच हंगेवाडी संबंधित ग्रामसेवकाने प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातमीचा राग मनात धरून अमोल शेळके यांच्या कानशिलात मारली. सदर प्रकरणी अमोल शेळके यांनी आश्वी पोलीस ठाण्यात ग्रामसेवक धराडे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी भादंवि कलम 323, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Visits: 29 Today: 1 Total: 116201

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *