ब्राह्मणगावमध्ये वृद्ध दाम्पत्यास मारहाण

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
मागील भांडणातील जामिनदारास फोन केल्याच्या रागातून पाच जणांनी एका वृद्ध दाम्पत्यास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांसह दगड, लाकडी दांडा तसेच लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे रविवारी (ता.25) सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली.

या मारहाणीत अशोक शंकर लोणारी ( वय 65) व पद्मावती अशोक लोणारी (दोघे रा.ब्राह्मणगाव, ता.कोपरगाव) हे वृद्ध दाम्पत्य जखमी झाले आहेत. या प्रकरणी अशोक लोणारी यांच्या फिर्यादीवरून अरविंद लक्ष्मण लोणारी, मयूर अरविंद लोणारी, लक्ष्मण शंकर लोणारी, कविता अरविंद लोणारी, कोमल अरविंद लोणारी (सर्व रा.ब्राह्मणगाव, ता.कोपरगाव) यांच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक आंधळे करीत आहे.

Visits: 163 Today: 1 Total: 1952391

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *