श्रीरामपूरमध्ये गुटखा विक्रेत्यांवर छापा; तिघांविरुद्ध गुन्हा


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
बंदी असतानाही शहरात गुटखा, सुगंधी तंबाखू विक्रीचे प्रकार सुरूच असल्याचे निदर्शनास येत असल्याने श्रीरामपूर शहरातील सय्यद बाबा चौक या भागात अन्न सुरक्षा अधिकारी व अन्न औषध प्रशासन विभागाने छापा टाकला. या छाप्यात 4 हजार 140 रुपयांचा माल जप्त करुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात गुटखा व पानमसाला, सुगंधी तंबाखू तत्सम अन्न पदार्थ विक्री साठा, उत्पादन व वाहतुकीस बंदी घातलेली असतानाही याची खुलेआम विक्री होत आहे. यामुळे अन्न औषध प्रशासनाने या अड्ड्यावर छापा टाकला आहे. या कारवाईत तिघांना ताब्यात घेतले असून 4 हजार 140 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बढे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अब्दुल अजीज करीम शेख (वय 48, रा.सुभेदार वस्ती, श्रीरामपूर) अमेर अब्दुल शमी कुरेशी (वय 30, रा.न्यू कोर्ट, श्रीरामपूर), सलीम महंमद सय्यद (वय 39, रा.कर्मवीर चौक, श्रीरामपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक पवार हे करीत आहेत.

Visits: 174 Today: 1 Total: 2168345

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *