गोरख कुटे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित
गोरख कुटे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना महामारीच्या संकटकाळात समाजातील अनेक दानशूर आणि सेवाभावी संस्था लढाई जिंकण्यासाठी सरसावल्या होत्या. त्यात संगमनेर शहरानजीकच्या वसंत लॉन्सचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष गोरख कुटे यांनीही सामाजिक उत्तरदायित्वातून वसंत लॉन्स कोरोना सेंटर म्हणून उपलब्ध करुन दिले होते. त्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र भूषण, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) भक्त परिवाराकडून नुकताच ‘कोविड योद्धा’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.
दरम्यानच्या काळात संगमनेर कोरोनाचे केंद्र बनले होते. या पार्श्वभूमीवर संक्रमण रोखण्यासाठी आणि रुग्णांना सेवा मिळण्यासाठी अनेकांनी पुढे येत मदतीचा हात दिला होता. त्यामध्ये वसंत लॉन्सचे संचालक गोरख कुटेही अग्रस्थानी होते. त्यांनी सामाजिक उत्तरदायित्वातून प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावत वसंत लॉन्स येथे कोविड सेंटर सोयी-सुविधांनी उपलब्ध करुन दिले. तसेच कोरोना योद्ध्यांनाही वैयक्तिक संरक्षण संचाचे वाटप केले. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना इंदोरीकर महाराज भक्त परिवाराकडून गौरविण्यात आले आहे.