संगमनेर तालुक्याने ओलांडले बाधितांचे अठरावे शतक..! शहरासह तालुक्यातील 16 जणांचे अहवाल कोविड संक्रमित

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील कोविडची स्थिती उंचावतच असून आजही तालुक्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या दोन-तिन दिवसांच्या अहवालातून ग्रामीणभागाच्या तुलनेत शहरातील रुग्णसंख्या कमी कमी होत असल्याने काहीसे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. मात्र असा अनुभव यापूर्वीही मिळालेला असल्याने तालुक्यासह शहरातही कोविडची दहशत मात्र कायम आहे. आज खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून तालुक्याच्या रुग्णसंख्येत 16 रुग्णांची भर पडली असून तालुक्याने रुग्णसंख्येचे अठरावे शतक ओलांडीत 1 हजार 815 चा आकडा गाठला आहे.

बुधवारी (ता.2) रात्री शासकीय प्रयोगशाळेकडून 21, खाजगी प्रयोगशाळेकडून 15 व रॅपिड अँटीजेन चाचणीतून एक अशा 37 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. विशेष म्हणजे या अहवालात संगमनेर शहरातील केवळ सहा जणांचा समावेश होता. त्यातून बाजारपेठेतील 67 वर्षीय महिला, मालदाड रोड परिसरातील 37 वर्षीय महिलेसह 28 वर्षीय तरुण, जानकीनगर परिसरातील 37 वर्षीय तरुण, कामगार वसाहतीतील 36 वर्षीय तरुण, तसेच येथील 48 वर्षीय इसम.

तर तालुक्यातील खराडी येथील 46 व 23 वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 38 वर्षीय महिला, निमोण येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 65 वर्षीय महिला, जोर्वे येथील 54 व तीस वर्षीय महिलांसह 26 वर्षीय तरुण, समनापुर येथील साठ 35 व 32 वर्षीय महिलेसह चार वर्षीय बालक, घुलेवाडीतील 61 वर्षीय महिलेसह 40 वर्षीय तरुण व 10 वर्षीय बालक, कुरकुटवाडीतील 68 वर्षीय जेष्ठ नागरिकासह 47 वर्षीय व सतरा वर्षीय तरुण, सारोळे पठार येथील 30 वर्षीय तरुण, निमगाव जाळी येथील 50 वर्षीय इसम, कौठे धांदरफळ येथील 36 वर्षीय तरुण, रायतेवाडी येथील 40 वर्षीय तरुण,

चिखली येथील 51 वर्षीय इसम, रहिमपुर येथील 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, अंभोरे येथील 36 वर्षीय तरुण, वाघापूर येथील 74 वर्षीय वयोवृद्ध इसम, सावरगाव तळ येथील 18 वर्षीय तरुणांसह बारा वर्षीय बालक, नांदूर खंदरमाळ येथील 50 वर्षीय इसम व चिंचोली गुरव येथील 34 वर्षीय तरुण अशा एकुण 37 रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांची बुधवारीच अठराव्या शतकाच्या दारात 1 हजार 799 वर पोहोचली होती, बुधवारी हुकलेले अठरावे शतक कोविडने आज साधले आहे.

गेल्या 1 सप्टेंबररोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी संगमनेर शहरातील माळीवाडा परिसरातील सत्तर वर्षीय नागरिकाच्या मृत्युसह 42 जणांचे अहवाल संक्रमित असल्याचे समोर आले होते, तर त्याच्या दुसर्याच दिवशी काल बुधवारी समनापूर येथील ज्येष्ठ नागरिकाचा बळी जाण्यासोबतच शीर व तालुक्यातील 37 जणांना कोविडची बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे बुधवारीच तालुक्याच्या रुग्णसंख्येने अठराव्या शतकाचा उंबरठा गाठला होता. आज वाढलेल्या रुग्णसंख्येने राहीलेले काम फत्ते करतांना अठरावे शतक ओलांडले आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालातूनही शहरातील सात जणांसह एकुण 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आज प्राप्त झालेले सर्व सोळा अहवाल खासगी प्रयोगशाळेचे असून त्यातून शहरातील शिवाजीनगर परिसरातून पाच रुग्ण समोर आले आहेत. त्यात 78, 48, 32 व 31 वर्षीय महिलांसह एक वर्षीय बालिका रंगारगल्लीतील 90 वर्षीय वयोवृद्ध महिला, गिरिराजनगर मधील 59 वर्षीय इसम असे एकूण शहरातील सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

त्यासोबतच आजच्या खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून संगमनेर खुर्द मधून पुन्हा तीन रुग्ण समोर आले आहेत. त्यात 38 व 16 वर्षीय महिलांसह सात वर्षीय बालक, वाघापूर येथील 45 वर्षीय तरुण, रहिमपुर येथील 57 वर्षीय महिला, साकुर मधील 75 वर्षीय इसमासह 69 वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द मधून 70 वर्षीय महिला, तर मंगळापूर मधील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा अहवाल पॉझिटिव आला आहे. आजच्या रूग्ण संख्येत गेल्या काही दिवसातील सरासरीपेक्षा कमी रुग्ण समोर आले असून आजच्या रुग्णवाढीने संगमनेर तालुक्याने बाधितांचे अठरावे शतक ओलांडले असून रुग्णसंख्या 1 हजार 815 वर पोहोचली आहे.

- जिल्ह्यातील ७७८ रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज..
- आतापर्यंत १९ हजार ९६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले..
- जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.५४ टक्के..
- जिल्ह्यात आज ६३२ बाधितांची भर..

अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ७७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ९६१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील सरासरी प्रमाणही आता ८५.५४ टक्के इतके झाले आहे.
- जिल्ह्यात उपचार सुरू असलेले रूग्ण : ३ हजार ४५
- जिल्ह्यातील एकूण मृत्यू : ३३०
- जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या : २३ हजार ३३६

