निर्मळ पिंपरीमधील अवैध दारुसाठ्यावर छापा

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक दोनने राहाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे नुकताच छापा टाकून विदेशी दारुसाठा, दोन टेम्पो व एक कार असा 20 लाख 80 हजार 445 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन चौघांना अटक केली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, निर्मळ पिंपरी येथे अवैध दारुचा साठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार भरारी पथक क्रमांक दोनने छापा टाकला असता विदेशी दारुसाठा, दोन टेम्पो व एक कार असा 20 लाख 80 हजार 445 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी दीपक मच्छिंद्र निर्मळ, (रा.निर्मळ पिंपरी, ता.राहाता), दीपक भाऊसाहेब पारधी (रा.जांबूत, ता.संगमनेर), किरण शांताराम गुंजाळ (कासार दुमाला, ता.संगमनेर), राजेंद्र सीताराम रहाणे (रा.चंदनापुरी, ता.संगमनेर) अशा चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी उपअधीक्षक संजय सराफ, निरीक्षक अनिल पाटील, संजय कोल्हे, पी.बी.अहिरराव, दुय्यम निरीक्षक के.यू.छत्रे, एम.डी.कोडे, ए.सी.खाडे, डी.वाय.गोलेकर, नंदकुमार परत, एन.आर.वाघ, ए.पी.तनपुरे, विकास कंठाळे आदिंनी केली आहे.

Visits: 179 Today: 1 Total: 2122384

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *